शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शेतकऱ्यांसाठी Toyota ची शानदार ऑफर; मका, सोयाबिनच्या बदल्यात मिळेल SUV कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 14:38 IST

toyota motors : टोयोटा बार्टर (Toyota Barter) नावाच्या या योजनेमध्ये शेतकरी सोयाबीन किंवा मका या धान्याच्या बदल्यात टोयोटा एसयूव्ही किंवा टोयोटा पिकअप घेऊ शकतील.

जपानी कंपनीने (Japanese Company) ऑटोमोबाईल क्षेत्रात (Automobile Sector) एक खास निर्णय घेत अनोखा ट्रेंड (Unique Payment Trend) आणला आहे. ही कंपनी दक्षिण अमेरिकेतील (South America) शेतकऱ्यांना लक्झरी कार खरेदी करण्याची संधी देत आहे. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांना कार खरेदी करण्यासाठी त्यांचे धान्य विकून पैसे द्यावे लागणार नाहीत, तर ते आपले धान्य थेट शोरूममध्ये आणू शकतील आणि त्या बदल्यात आलिशान कार घरी घेऊन जाऊ शकतील.

टोयोटा बार्टर (Toyota Barter) नावाच्या या योजनेमध्ये शेतकरी सोयाबीन किंवा मका या धान्याच्या बदल्यात टोयोटा एसयूव्ही किंवा टोयोटा पिकअप घेऊ शकतील. कंपनीनने याला अॅग्री बिझनेसचे नाव देत शेतकऱ्यांना सर्वोत्तम ऑफर दिली आहे. सोयाबीन आणि मका या धान्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना टोयोटा हिलक्स पिकअप ट्रक, टोयोटा फॉर्च्युनर किंवा टोयोटा कोरोला क्रॉस एसयूव्ही ही वाहने मिळून शकतील.

धान्याच्या बदल्यात मिळणार कारया ऑफरसाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि मका हे धान्य बाजार भावाने घेतले जाईल. या धान्याचे वजन बाजारभावाप्रमाणे कारच्या दरापर्यंत होईल, त्यावेळी ती कार शेतकऱ्याची असेल. तसेच, या धान्याची आधी चांगली तपासणी केली जाईल. गुणवत्ता तपासणीनंतरच ते घेतले जाईल. दरम्यान, आपल्या माहितीसाठी ब्राझीलमध्ये टोयोटाची 16 टक्के थेट विक्री कृषी क्षेत्रातून येते. अशा परिस्थितीत कार निर्मात्यांना आशा आहे की, ही ऑफर त्यांची विक्री वाढवणार आहे.

रोख किंवा कार्ड पेमेंटची झंझट नाही2019 साली हा पायलट प्रोजेक्ट कंपनीने सुरू केला आहे. परंतु आता हा अॅग्री बिझनेस वाढवला जात आहे, जेणेकरून कंपनीला विक्रीमध्ये लाभ मिळू शकेल. ही योजना ब्राझीलमधील बाहिया, मॅटो ग्रासो, गोईयास, साओ पाउलो सारख्या भागात चालू आहे. आता ते इतर ठिकाणीही राबविली जात आहे. तसेच, या पेमेंट सिस्टीमद्वारे, रोख किंवा कार्डद्वारे पेमेंट करण्याची समस्या येत नाही आणि शेतकरी थेट धान्य देऊन गाडी त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतात. दरम्यान, पूर्वीच्या काळात धान्याच्या बदल्यात साहित्य घेण्याची व्यवस्था भारतातही चालू होती. मात्र, सध्या कंपनी ही योजना भारतीय बाजारात आणणार नाही, परंतु काही वाहने नक्कीच आणणार असल्याचे समजते.

टॅग्स :AutomobileवाहनFarmerशेतकरीbusinessव्यवसाय