शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

टोयोटाची आलिशान यारिस कार लॉन्च, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 17:28 IST

टोयोटा कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षीत मध्यम आकाराची सिडेन यारिस ही कार बुधवारी लॉन्च केली. या आकर्षक कारचे 4 व्हेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : टोयोटा कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षीत मध्यम आकाराची सिडेन यारिस ही कार बुधवारी लॉन्च केली. या आकर्षक कारचे 4 व्हेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. सध्या ग्राहक ही कार 50 हजार रुपये देऊन बुक करु शकता. 

किती आहे कारची किंमत?

यारिस या कारची किंमत 8.5 लाख रुपयांपासून सुरु होते. ही केवळ पेट्रोल इंजिनची किंमत आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.07 लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. ही कार आकर्षक 6 रंगांमध्ये मिळणार आहे.

दमदार इंजिन

टोयोटाने ही कार 4 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. यात मॅन्यूअल आणि सीवीटी ऑटोमॅटीक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या कारमध्ये 1.5 लीटरचं 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून ते 107 बीएचपीची पॉवर आणि 140 न्यूटन-मीटरचा टॉर्क जनरेट करतं. यारिस कारमध्ये 6 स्पीड मॅन्यूअल आणि 7 स्पीड सीवीटी ऑटोमॅटीक ट्रान्समिशनचा पर्याय मिळणार आहे.

काय आहे खासियत?

या कारच्या टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टीममध्ये गेस्चर कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टम असे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चारही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यासोबतच कारमध्ये 7 एअरबॅग्स, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएससारखे फिचर्स देण्यात आले आहेत. 

वेगवेगळ्या व्हेरियंटची किंमत

मॅन्यूअल ट्रान्समिशन    सीवीटी ऑटोमॅटिकJ    Rs 8,75,000/-    Rs 9,95,000/-G    Rs 10,56,000/-    Rs 11,76,000/-V    Rs 11,70,000/-    Rs 12,90,000/-VX    Rs 12,85,000/-    Rs 14,07,000/-

टॅग्स :AutomobileवाहनToyotaटोयोटा