शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

स्वत: मालक! जबरदस्त बॉक्समधून Tork Kratos ची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 11:15 IST

टॉर्क मोटर्सची ही बाईक दोन प्रकारात येते. टॉर्क क्रेटॉस आणि टॉर्क क्रेटॉस आर (Tork Kratos R) यांना चांगली रेंज आहे.

पुण्यातील ईलेक्ट्रीक बाईक कंपनी टॉर्क मोटर्स (Tork Motors) ने काही दिवसांपासून ईलेक्ट्रीक बाईकची डिलिव्हरी सुरु केली आहे. यासाठी मालकाने भन्नाट आयडिया वापरली आहे, लहान मुलांच्या रिमोटच्या कार जशा एका आकर्षक बॉक्समधून येतात तशा पद्धतीने क्रेटॉस बाईकची डिलिव्हरी करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष यातील बाईककडे जात होते. 

टॉर्क मोटर्सची ही बाईक दोन प्रकारात येते. टॉर्क क्रेटॉस आणि टॉर्क क्रेटॉस आर (Tork Kratos R) यांना चांगली रेंज आहे. पुण्यात या बाईकची डिलिव्हरी सुरु झाली आहे. याचा व्हिडीओ कंपनीने यूट्यूबवर पोस्ट केला आहे. यामध्ये कंपनीचे मालक कपिल शेळके स्वत: बाईकची डिलिव्हरी देण्यासाठी ग्राहकाच्या घरी गेले होते. टॉर्क मोटर्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, टॉर्क मोटर्सचे सीईओ कपिल शेळके त्यांच्या घरातून बाहेर पडतात. त्यांच्या कारच्या मागील बाजूस टॉर्क क्रॅटोसने भरलेले पार्सल बॉक्स कॅरिअर जोडतात आणि ग्राहकाच्या घरी पोहोचतात. बाईकच्या बॉक्सवर त्याची वैशिष्ट्येही सांगण्यात आली होती. पुण्यात टॉर्क क्रॅटोस आणि क्रॅटोस आरच्या 20 युनिट्स वितरित करण्यात आल्या आहेत. 

Tork Motors ने Kratos आणि Kratos R हे दोन व्हेरिअंट लाँच केले आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत १.०२ लाख आहे.  ही किंमत दिल्ली एक्सशोरुम आहे, यामध्ये सबसिडीदेखील जोडलेली आहे. Tork Motors ने २६ जानेवारीपासूनच या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. पुण्यात या बाईकची किंमत १.०७ लाखांपासून सुरु होते.

बॅटरी आणि रेंज...मोटरसायकलमध्ये 48V ची IP67-रेटेड 4 Kwh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. याची रेंज १८० किमी आहे. तर रिअल वर्ल्ड रेंज ही १२० किमी आहे. ही मोटरसायकल १०० किमी प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. यामध्ये एक्सियल फ्लक्स टाइप इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. चार सेकंदांत ही मोटरसायकल 0-40 किमी प्रति तासाचा वेग पकडते. Kratos R मध्ये अधिक क्षमतेची मोटर आहे. याचा टॉप स्पीड 105 kmph आहे. फास्ट चार्जिंग सुविधा केवळ Kratos R मध्ये देण्यात आली आहे. तसेच जियोफेंसिंग, फाइंड माई व्हीकल फीचर, मोटरवॉक असिस्ट, क्रॅश अलर्ट, व्हेकेशन मोड, ट्रॅक मोड आदी देण्यात आले आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर