भारतीय ऑटोमोबाईल बाजारासाठी फेब्रुवारी महिना अत्यंत लाभदायक ठरला. या महिन्यात ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर कार खरेदी केल्या. एकूण विक्रीच्या आकडेवारीमध्ये 'टाटा नेक्सॉन'ने (Tata Nexon) प्रथम क्रमांक पटकावत आपला जलवा दाखवला. टाटा नेक्सॉनने फेब्रुवारी महिन्यात तब्बल १९,४३० युनिट्सची विक्री केली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या (फेब्रुवारी २०२५) १५,३४९ युनिट्सच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये २७ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, या यादीत ७००० हून अधिक युनिट्सच्या विक्रीसह टाटा टियागोचे शेवट्या स्थानावर राहिली.
टाटा पंचची दमदार कामगिरीविक्रीच्या या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी डिझायर असून, या कारने ३२ टक्के वार्षिक वाढीसह १९,३२६ युनिट्सची विक्री केली. तर तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा टाटा समूहाची 'टाटा पंच' राहिली. २९ टक्के वाढीसह या कारने १८,७४८ युनिट्सची विक्री नोंदवली आहे. तसेच, चौथ्या क्रमांकावर १० टक्के वाढीसह १७,९३८ युनिट्स विकणारी ह्युंदाई क्रेटा राहिली. याशिवाय, मारुती सुझुकी ब्रेझा १७,८६३ युनिट्स पाचव्या क्रमांकावर आहे.
बघा टॉप-25 कारची लिस्टि -टाटा नेक्सॉन – १९,४३०मारुती सुझुकी डिझायर – १९,३२६टाटा पंच – १८,७४८ह्युंदाई क्रेटा – १७,९३८मारुती सुझुकी ब्रेझा – १७,८६३मारुती सुझुकी अर्टिगा – १७,८०७मारुती सुझुकी वॅगनआर – १४,८८५मारुती सुझुकी स्विफ्ट – १४,८३३महिंद्रा स्कॉर्पिओ – १४,६६५मारुती सुझुकी बलेनो – १४,६३२मारुती सुझुकी फ्रॉन्क्स – १३,८९८मारुती सुझुकी व्हिक्टोरीस – १३,०२१मारुती सुझुकी इको – ११,६२०महिंद्रा थार – ११,०४७ह्युंदाई व्हेन्यू – १०,४९४किया सेल्टोस – १०,३०८महिंद्रा बोलेरो – ९,८६३मारुती सुझुकी अल्टो – ९,७८७किया सोनेट – ९,७५०टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर – ९,३५९महिंद्रा XUV 7XO – ९,११२टोयोटा इनोव्हा हायक्रॉस – ८,७०३महिंद्रा XUV 3XO – ८,६३७टाटा सिएरा – ७,१००टाटा टियागो – ७,०४०
Web Summary : Tata Nexon topped February car sales with 19,430 units, a 27% increase. Maruti Suzuki Dzire and Tata Punch followed. Hyundai Creta and Maruti Suzuki Brezza also featured in the top five.
Web Summary : फरवरी में 19,430 यूनिट्स के साथ टाटा नेक्सन की कार बिक्री में शीर्ष स्थान, 27% की वृद्धि। मारुति सुजुकी डिजायर और टाटा पंच दूसरे और तीसरे स्थान पर रहे। हुंडई क्रेटा और मारुति सुजुकी ब्रेज़ा भी शीर्ष पांच में शामिल हैं।