शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

टेस्लाला शाओमीचा धोबीपछाड! इलेक्ट्रीक कार SU7 भारतात या दिवशी लाँच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 15:26 IST

Xiaomi SU7 in India: शाओमीची ही पहिलीच कार आहे. ही कार चार व्हेरिअंटमध्ये असणार आहे. एक एंट्री लेव्हल, एक प्रो, मॅक्स आणि एक लिमिटेड फाऊंडर्स एडिशन असणार आहे.

स्मार्टफोन बनविणारी कंपनी शाओमीने टेस्लाच्या भारतात येण्याच्या स्वप्नांना मागे टाकले आहे. शाओमी भारतीय वाहन बाजारात पाय रोवण्यास तयार झाली असून पहिली इलेक्ट्रीक सेदान Xiaomi SU7 ला भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. ही कार बंगळुरूमध्ये लाँच केली जाणार आहे. 

शाओमीची ही पहिलीच कार आहे. ही कार चार व्हेरिअंटमध्ये असणार आहे. एक एंट्री लेव्हल, एक प्रो, मॅक्स आणि एक लिमिटेड फाऊंडर्स एडिशन असणार आहे. ही सेदान सारखी जरी दिसत असली तरी एक प्रिमिअम कार असणार आहे. बंगळुरुमध्ये ९ जुलै रोजी ही कार लाँच केली जाणार आहे. 

कंपनीने चीनमध्ये या कारची बुकिंग सुरु केली आहे. या कारची किंमत 215,900 युआन ते 299,900 युआन ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनामध्ये या कारची किंमत 25 ते 30 लाख रुपयांमध्ये असणार आहे. या कारचे नाव Xiaomi SU7 ठेवण्यात आले असून ही कार टेस्लाच्या सेदान कारसारखीच आहे. परंतू टेस्लाच्या Tesla Model 3 कारपेक्षा स्वस्त आहे. टेस्लाची कार चीनमध्ये 245,900 युआन पासून सुरुवातीच्या किंमतीमध्ये विकली जाते. 

एसयु ७ ही कार कंपनीचे स्मार्टफोन, हायपरओएससोबत ऑपरेटिंग सिस्टिम शेअर करते. बीजिंग ऑटोमोटिव इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेड या कारचे उत्पादन करत आहे. या कारमध्ये वेगवेगळ्या व्हील साईज पर्याय देण्यात येत आहे. या कारचे बेस मॉडेलचे वजन 1,980 किलोग्राम आहे. टॉप स्पीड 210 प्रति तास असून ६६८ किमीची रेंज देते. तर याचे वरचे व्हेरिअंट 2,205 किलो आहे. टॉप स्पीड 265 किमी असून 101kWh ची बॅटरी एका चार्जमध्ये ८०० किमीची रेंज देते.  

टॅग्स :xiaomiशाओमीElectric Carइलेक्ट्रिक कार