शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेस्लाची कार फक्त 20 लाखांना मिळणार? कंपनीची सरकारसोबत चर्चा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 13:13 IST

टेस्लाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अमेरिकेत झालेली भेट फलदायी ठरणार आहे. टेस्लाने भारतात आपले युनिट स्थापन करण्यासाठी लागणारी प्रक्रिया जोरात सुरू केली आहे. टेस्ला कंपनीची सरकारसोबत चर्चा सुरू झाली आहे. टेस्ला कंपनीने युनिटचे वार्षिक उत्पादन किती असेल याची संपूर्ण योजना तयार केली आहे. देशात किती रुपयांची कार असणार आहे. तसेच, सरकार आणि सामान्य लोकांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी टेस्लाच्या योजनेत आहेत. 

काय आहे टेस्लाची योजना?इलॉन मस्क यांच्या टेस्लाने भारतात आपले युनिट स्थापन करण्यासाठी भारत सरकारशी बोलणी सुरू केली आहेत. या फॅक्टरीत टेस्ला 20 लाख रुपयांची कार तयार करण्याचा विचार करत आहे. टेस्लाचे हे युनिट एका वर्षात 5 लाख वाहने तयार करू शकणार आहे. दरम्यान, टेस्लाला इंडो पॅसिफिक प्रदेशात असलेल्या देशांमध्ये आपला व्यवसाय वाढवायचा आहे आणि टेस्ला वाहने तिथपर्यंत पोहोचवायची आहेत. यामुळेच टेस्लाने भारतात आपल्या उद्योग आणण्यास तयारी दर्शविली आहे. लवकरच चीनसोबत भारत देखील टेस्ला वाहनांचा प्रमुख निर्यातदार म्हणून उदयास येऊ शकतो.

स्थानिक उत्पादन आणि निर्यात दोन्हींचा समावेश एका सूत्राने सांगितले की, टेस्ला आपल्याकडे महत्वाकांक्षी योजना घेऊन आली आहे. आम्हाला खात्री आहे की यावेळी सर्व गोष्टी सकारात्मक होतील. ज्यामध्ये स्थानिक उत्पादन आणि निर्यात दोन्ही समाविष्ट आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय टेस्लासोबत चर्चा करत आहे. टेस्लासोबत सरकार अधिक चांगली डील करु शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, टेस्लाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. जूनमध्ये टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क म्हणाले होते की, कंपनी लवकरात लवकर भारतात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी हे वक्तव्य केले होते.

टॅग्स :Teslaटेस्लाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार