शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, निवडणूक आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी...
6
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
7
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
8
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
9
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
10
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
11
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
12
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
13
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
14
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
15
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
16
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
17
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
18
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
19
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:00 IST

भारतीय बाजारात पाय रोवण्यासाठी टेस्ला आपल्या कारच्या किंमती कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अमेरिकी टेस्ला कंपनीची कार घेण्याचे अनेकांच्या मनात आहे, परंतू तिची किंमत पाहून अनेकांचा हिरमोड होत आहे. याचा फटका टेस्लाला जरा लवकरच बसला असून कंपनीने अधिक नुकसान होण्यापूर्वीच एक मोठा निर्णय घेण्याचा विचार चालविला आहे. भारतीय बाजारात पाय रोवण्यासाठी टेस्ला आपल्या कारच्या किंमती कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

हा निर्णय लगेच नाही परंतू, येत्या चार-पाच वर्षांत साठ लाखांना असलेली टेस्ला कार २० लाख रुपयांनी स्वस्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  टेस्ला कंपनीने जुलै २०२५ मध्ये भारतात बुकिंग सुरू केली असली तरी, किंमत जास्त असल्यामुळे आतापर्यंत फक्त १४० युनिट्सचीच विक्री करता आली आहे. ती देखील राजकारणी, सिनेसृष्टी, उद्योगपती अशा हौशींनीच खरेदी केली आहे.

या फटक्यामुळे कंपनीने भारतात तरी असा चढ्या दराचा आडमुठेपणा न करण्याचे धोरण राबविण्याचे ठरविले आहे. टेस्लाचे भारतातील जनरल मॅनेजर शरद अग्रवाल यांनी रॉयटर्सला सांगितले की, भारतीय ग्राहक किमतीला खूप महत्त्व देतात. त्यामुळे कंपनी किंमत कमी करण्याचा विचार करत आहे. 

सध्या टेस्लाच्या कारची किंमत भारतात जास्त आहे. टेस्लाच्या एंट्री-लेव्हल मॉडेल Y ची किंमत ६० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, कारण आयात शुल्क खूप जास्त आहे (काही वाहनांवर १००% पर्यंत). त्यामुळे भारतातील सरासरी EV किंमत (सुमारे २२ लाख रुपये) च्या तुलनेत टेस्लाची कार तिप्पट महाग आहे.

अमेरिकेच्या तुलनेत भारतात टेस्ला मॉडेल Y सुमारे ७०% अधिक महाग आहे. टेस्लासाठी चीनची प्रतिस्पर्धी कंपनी BYD ने भारतात आपली 'सिलीऑन 7 एसयूव्ही'च्या १,२०० हून अधिक युनिट्सची विक्री करून चांगले प्रदर्शन केले आहे. तसेच आता विनफास्टची देखील भारतात एन्ट्री झाली आहे. या कंपनीचया कार तर एसयुव्ही असून त्या १८-२० लाखांपासून उपलब्ध आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tesla Car Prices in India May Drop by ₹2 Million

Web Summary : Tesla may cut Indian car prices by ₹2 million due to slow sales. High import duties make Tesla cars expensive compared to competitors like BYD and VinFast. A decision on price reduction is expected in the coming years.
टॅग्स :Teslaटेस्लाelon muskएलन रीव्ह मस्क