शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटमध्ये TATA धमाका करणार, एका पाठोपाठ एक 4 SUV येणार; जाणून घ्या खासियत अन् फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:19 IST

विशेष म्हणजे यांपैकी एका एसयूव्हीमध्ये सीएनजी सुविधा मिळणार आहे. पहा या चारही कारची यादी...

टाटा मोटर्स ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार विकणारी कंपनी आहे. यातही टाटा नेक्सॉन ही कंपनीची सर्वाधिक विकली जाणारी कर आहे. कंपनी आपला पोर्टफोलिओ सतत्याने वाढवताना दिसत आहे. आता कंपनी लवकरच 4 SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे यांपैकी एका एसयूव्हीमध्ये सीएनजी सुविधा मिळणार आहे. पहा या चारही कारची यादी...

Tata Harrier and Safari Facelift -देशात 2023 Tata Harrier आणि Safari फेसलिफ्टची बुकिंग  आधीपासूनच सुरू झाली आहे. या कारमध्ये अॅडव्हॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम (ADAS) सर्वात मोठ्या अपग्रेडच्या स्वरुपात येईल. या दोन्ही एसयूव्हीमध्ये नवे 10.5 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, 7 इंचाचे सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 360 डिग्री कॅमेराही मिळू शकतो. यांच्या डिझाईनमध्येही काही बदल केला जाऊ शकतो. अपडेटेड हॅरियर आणि सफारी मध्ये 2.0L टर्बो डिझेल इंजिनचा वापर कायम असेल. जे 170bhp आणि 350Nm टार्क जेनरेट करते. ट्रान्समिशन ऑप्शन मध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश आहे.

New Tata Nexon 2024 -माध्यमांतील वृत्तांनुसार, 2023 Tata Nexon फेसलिफ्ट ऑगस्टपर्यंत बाजारात येईल. यात अधिकांश कॉस्मॅटिक बदल समोरच्या बाजुला केले जातील. एवढेच नाही, तर ही कार ADAS तत्रज्ञानासह सादर करण्यात येईल असेही बोलले जात आहे. कॉम्पॅक्ट टाटा एसयूव्हीमध्ये नव्या हॅरियर आणि सफारीकडून एक नवी टचस्क्रीन इंफोटेनमेंट यूनिट घेण्याचीही शक्यता आहे. यात 1.2L पेट्रोल (125bhp/225Nm) आणि 1.5L डिझेल इंजिन मिळत राहील.

Tata Punch CNG -टाटा पंच सीएनजीला 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. ही कार येणाऱ्या काही महिन्यात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये फॅक्ट्री-फिटेड सीएनजी किटसह 1.2L, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे जवळपास 70bhp - 75bhp पॉवर आणि 100Nm च्या जवळपास टॉर्क देईल. ही कार केवळ मॅन्युअल गिअरबॉक्ससह सादर केली जाईल. पंच सीएनजीमध्ये नवे डुअल सिलिंडर लेआऊट आहे. जे एक चांगले बूट स्पेस ऑफर करते.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकारMarketबाजार