नवी दिल्ली : सीएनजी (CNG) कार खरेदी करताना ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळत नाही, त्यामुळे केवळ मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या सीएनजी कार खरेदी कराव्या लागत असल्याची भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे. मात्र, पण लवकरच या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण टाटा मोटर्स भारतातील पहिली सीएनजी ऑटोमॅटिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
दिग्गज ऑटो ब्रँड Tiago CNG आणि Tigor CNG मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देणार आहे. टाटाने त्याचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. Tiago CNG आणि Tigor CNG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेल्या देशातील पहिल्या सीएनजी कार बनतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात XT आणि XZ+ मध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन (AMT) ऑप्शन दिला जाऊ शकतो. दरम्यान, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या सीएनजी कारची वाट पाहत असणाऱ्या ग्राहकांसाठी हे अपडेट खूप महत्वाचे आहे.
इंजिनऑटोमॅटिक अवतार घेताना Tiago आणि Tigor CNG चे डिझाईन सध्याच्या मॉडेल्सप्रमाणेच असणार आहे. टाटा कारमध्ये स्वीप्टबॅक प्रोजेक्टर हेडलाइट्स, स्लीक ग्रिल, ऑटो-फोल्डिंग ORVMs, एन्व्हलपिंग टेललाइट्स आणि टू-टोन अलॉय व्हील यांसारखे फीचर्स मिळतील.
फीचर्सहॅचबॅक आणि सेडान दोन्हीमध्ये प्रीमियम अपहोल्स्ट्रीसह 5 सीटर केबिन मिळेल. याशिवाय डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि 7-इंचाचे इन्फोटेनमेंट पॅनल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. तसेच, कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मल्टिपल एअरबॅग्ज, ABS, ESC आणि EBD सारखी सुरक्षा फीचर्स उपलब्ध असतील.
इंजिनटाटा Tiago आणि Tigor सीएनजीमध्ये 1.2 लिटर, तीन सिलिंडर, नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनचे पॉवर मिळते. मात्र, सीएनजीवर चालताना त्याची पॉवर कमी होते. सध्या हे मॉडेल 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन मिळाल्यानंतर कार खरेदी करणाऱ्यांसाठी ते अधिक सोपे होईल.
किंमतऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या एंट्रीमुळे सीएनजी कार चालवणे पूर्वीपेक्षा सोपे होणार आहे. सध्या टाटा Tiago सीएनची एक्स-शोरूम किंमत 6.54 लाख रुपयांपासून सुरू होते, तर Tigor सीएनजी एक्स-शोरूम किंमत 7.79 लाख रुपये आहे. तर, टाटा मोटर्स सीएनजी ऑटोमॅटिक कारच्या किंमती लाँच करण्याची वेळ जवळ आल्यावर जाहीर करेल.