शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, खरेदीवर 9 लाखांची बचत, पेट्रोल-डिझेलचा पडेल विसर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 3:43 PM

Tata Tigor EV : या कारमध्ये तुम्हाला 300 किमी पेक्षा जास्त रेंज, 4 स्टार सुरक्षा रेटिंग आणि 8 वर्षांची वॉरंटी मिळते. 

नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक कारच्या विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनी एकाच वेळी 3 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत आहे. यातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारटाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV) आहे. या कारमध्ये तुम्हाला 300 किमी पेक्षा जास्त रेंज, 4 स्टार सुरक्षा रेटिंग आणि 8 वर्षांची वॉरंटी मिळते. 

एवढेच नाही तर टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV) खरेदी करून तुम्ही 9 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. टाटा टिगोर ईव्ही XE, XM आणि XZ+ या तीन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत 12.24 लाख रुपये ते 13.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही डेटोना ग्रे आणि सिग्नेचर टील ब्लू या दोन रंगांच्या ऑप्शनमध्ये येते. 

एक्सटीरिअर बोलायचे तर, यात ब्लॅक कलरचे रुप, एलईडी डीआरएल, नवीन डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल आणि हायपर स्टाइल व्हील देण्यात आले आहेत. यात इलेक्ट्रिक मोटरसह 26kWh बॅटरी पॅक आहे, जो 75PS/170Nm आउटपुट देतो. हे स्टँडर्ड वॉल चार्जरद्वारे 8.5 तासांमध्ये 0-80 टक्के चार्ज केले जाऊ शकते. तर फास्ट चार्जरद्वारे 65 मिनिटांत 80 टक्के चार्ज करता येईल. कारची ARAI सर्टिफाइड रेंज 306 किमी आहे.

कशी होईल 9 लाखांची बचत?टाटा मोटर्सने आपल्या वेबसाइटवर एक कॅल्क्युलेटर देखील बनवले आहे, ज्याद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार तुमची किती बचत करेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज 100 किमी चालवत असाल आणि पेट्रोलची किंमत 96 रुपये प्रति लीटर गृहीत धरली, तर टाटा मोटर्सच्या मते तुम्ही 5 वर्षांत एकूण 9 लाखांची बचत करू शकाल.

टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कार