सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, खरेदीवर 9 लाखांची बचत, पेट्रोल-डिझेलचा पडेल विसर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 03:43 PM2022-09-18T15:43:06+5:302022-09-18T15:43:49+5:30

Tata Tigor EV : या कारमध्ये तुम्हाला 300 किमी पेक्षा जास्त रेंज, 4 स्टार सुरक्षा रेटिंग आणि 8 वर्षांची वॉरंटी मिळते. 

tata tigor ev with 306km range can save up to 9 lakh rupees in 5 years | सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, खरेदीवर 9 लाखांची बचत, पेट्रोल-डिझेलचा पडेल विसर 

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, खरेदीवर 9 लाखांची बचत, पेट्रोल-डिझेलचा पडेल विसर 

Next

नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक कारच्या विक्रीच्या बाबतीत टाटा मोटर्स पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनी एकाच वेळी 3 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत आहे. यातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारटाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV) आहे. या कारमध्ये तुम्हाला 300 किमी पेक्षा जास्त रेंज, 4 स्टार सुरक्षा रेटिंग आणि 8 वर्षांची वॉरंटी मिळते. 

एवढेच नाही तर टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV) खरेदी करून तुम्ही 9 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. टाटा टिगोर ईव्ही XE, XM आणि XZ+ या तीन ट्रिममध्ये उपलब्ध आहे. कारची किंमत 12.24 लाख रुपये ते 13.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही डेटोना ग्रे आणि सिग्नेचर टील ब्लू या दोन रंगांच्या ऑप्शनमध्ये येते. 

एक्सटीरिअर बोलायचे तर, यात ब्लॅक कलरचे रुप, एलईडी डीआरएल, नवीन डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल आणि हायपर स्टाइल व्हील देण्यात आले आहेत. यात इलेक्ट्रिक मोटरसह 26kWh बॅटरी पॅक आहे, जो 75PS/170Nm आउटपुट देतो. हे स्टँडर्ड वॉल चार्जरद्वारे 8.5 तासांमध्ये 0-80 टक्के चार्ज केले जाऊ शकते. तर फास्ट चार्जरद्वारे 65 मिनिटांत 80 टक्के चार्ज करता येईल. कारची ARAI सर्टिफाइड रेंज 306 किमी आहे.

कशी होईल 9 लाखांची बचत?
टाटा मोटर्सने आपल्या वेबसाइटवर एक कॅल्क्युलेटर देखील बनवले आहे, ज्याद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार तुमची किती बचत करेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही दररोज 100 किमी चालवत असाल आणि पेट्रोलची किंमत 96 रुपये प्रति लीटर गृहीत धरली, तर टाटा मोटर्सच्या मते तुम्ही 5 वर्षांत एकूण 9 लाखांची बचत करू शकाल.

Web Title: tata tigor ev with 306km range can save up to 9 lakh rupees in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.