शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Tata Tigor CNG XM व्हेरिअंट लॉन्च, 4 स्टार रेटिंगवाली स्वस्त कार; वाचा किंमत अन् फिचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 14:47 IST

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी कारच्या विक्रीत वाढ होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने टाटा टिगोर सीएनजी एक्सएम (Tata Tigor CNG XM) व्हेरिअंट कार लॉन्च केली आहे.

नवी दिल्ली-

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी कारच्या विक्रीत वाढ होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सने टाटा टिगोर सीएनजी एक्सएम (Tata Tigor CNG XM) व्हेरिअंट कार लॉन्च केली आहे. भारतातील लहान-मोठ्या शहरांमध्ये सीएनजी सहज उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल सीएनजी कारकडे वळत आहे. Tata Motors ही मारुती सुझुकी आणि Hyundai नंतर भारतातील तिसरी सर्वात मोठी कार कंपनी आहे, जी फॅक्टरी फिटेड CNG कार विकते. Tata Tigor व्यतिरिक्त कंपनी CNG सेगमेंटमध्ये Tata Tiago कार विकते. टाटा टिगोर सीएनजीच्या नवीन प्रकारात चार रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.

Tata Tigor CNG XM Price: कीमत किती?Tata Motors ने Tigor CNG चा कारचं नवीन व्हेरिअंट लॉन्च केलं आहे ज्याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 7.4 लाख रुपये आहे. नव्या टाटा टिगोर CNG XZ व्हेरियंटपेक्षा 50,000 रुपये स्वस्त आहे. त्याच वेळी, टाटा टिगोरच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत ६ लाख रुपयांपासून ते ८.२९ लाख रुपयांपर्यंत सुरू होते. Tata Tigor च्या CNG व्हेरिअंटची किंमत आता ७.४ लाख ते ८.५९ लाख रुपयांच्या घरात आहे.

Tata Tigor iCNG: फीचर्सटाटा मोटर्स टिगोर सीएनजी कारची आयसीएनजी म्हणून विक्री केली जाते. Tigor CNG चा XM व्हेरिअंट चार रंगांच्या पर्यायांमध्ये येतो - ओपल व्हाइट, डेटोना ग्रे, ऍरिझोना ब्लू आणि डीप रेड. Tata Tigor iCNG मध्ये, ग्राहकांना रेन सेन्सिंग वायपर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि ब्लॅक आणि बेज कलर इंटिरियर्स, ड्युअल टोन कलर रूफसह नवीन फॅब्रिक सीट्स यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

Tata Tigor CNG: इंजिन आणि मायलेजटाटा टिगोर CNG आणि Tiago CNG दोन्ही कारमध्ये १.२ लीटर ३ सिलेंडर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहेत. ग्राहकांना दोन्ही कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. CNG वर टाटा टिगोरचे ARAI प्रमाणित मायलेज 26.49 kmpl आहे. टाटाच्या दोन्ही सीएनजी कार नुकत्याच लाँच झालेल्या मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी, वॅगन आर सीएनजी आणि ह्युंदाई ऑरा सीएनजीशी स्पर्धा करतात.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन