शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

TATA मारुती, ह्युंदाईला टक्कर देणार; लोकप्रिय Tiago सीएनजीमध्ये येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 12:52 IST

Tata Tiago Cng variant: टाटा टियागोची हॅचबॅक कार सध्या 9 व्हेरिअंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये 4 ट्रीम XE, XT, XZ आणि XZ+ आहेत. यापैकी एक किंवा दोन ट्रीममध्ये सीएनजी दिला जाणार आहे.

पेट्रोल किंमती पुन्हा एकदा शंभरी पार (petrol diesel Price hike) गेल्या आहेत. अनेक ठिकाणी 99 च्या आकड्यावर आहेत. अशावेळी मारुतीसह काही कंपन्यांनी डिझेल कार बंद केल्याने पेट्रोलचीकार घेणे परवडणारे नाहीय. मारुतीच्या ताफ्यात एकसोएक सीएनजी कार (Affordable CNG cars) आहेत. आता टाटा मोटर्सदेखील भारतीय बाजारात सीएनजी कार लाँच करणार आहे. टाटा त्यांची लोकप्रिय हॅचबॅक कार TaTa Tiago (टियागो) सीएनजीमध्ये आणणार आहे. भविष्यात टिगॉर या सेदान कारलादेखील सीएनजीमध्य़े टाटा लाँच  करण्याची शक्यता आहे. (Tata Tiago CNG Variant Spotted Testing.) 

टाटाच्या टियागो कारला सीएनजी किट व्हेरिअंटला टेस्टिंगवेळा पाहण्यात आले आहे. लुकमध्ये काही बदल नसले तरी देखील ही कार पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे परवडणारी ठरणार आहे. टाटाच्या या कराने कंपनीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस दाखविले होते. ( Tata Motors is working on the CNG models of Tiago and Tigor for the Indian market)

टियागो सीएनजीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. कारच्या व्हायरल झालेल्या फोटोंवरून ही कार मधल्या व्हेरिअंटची आहे. लाल रंगातील हे फोटो व्हायरल झाले आहेत. पुढे सीएनजीचा स्टीकर लावलेला आहे. कारला नवे मल्टी स्पोक अलॉय व्हील देण्यात आले आहेत. कारच्या फ्रंट ग्रीलमध्ये ट्राइ-एरो थीम देण्यात आले आहे. कारमध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन इंजिन आहे. यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते. हे इंजिन पेट्रोलवर 85 bhp ताकद, 113 Nm पीक टॉर्क तयार करते. सीएनजी मॉडेलमध्ये यात काहीशी घट होणार आहे.

टाटा टियागोची हॅचबॅक कार सध्या 9 व्हेरिअंटमध्ये बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये 4 ट्रीम XE, XT, XZ आणि XZ+ आहेत. यापैकी एक किंवा दोन ट्रीममध्ये सीएनजी दिला जाणार आहे. टियागोची एक्स शोरुम किंमत 4.99 लाख रुपये आहे. टाटाच्या या सीएनजी कारची टक्कर थेट मारुतीची सेलेरिओ, व्हॅगन आर, ह्युंदाईची सँट्रोसारख्या कारशी होणार आहे.  

टॅग्स :TataटाटाPetrolपेट्रोलcarकार