शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

टाटा टियागो ईव्हीची डिलीव्हरी सुरु होताच किंमती वाढविल्या...; सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार एवढी झाली महाग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 22:22 IST

टाटा टियागो ईव्ही ही देशातील ‘फास्‍टेट बुक ईव्‍ही’ बनली होती. पहिल्याच दिवशी १० हजार युनिट्स बुक करण्यात आले होते.

ईलेक्ट्रीक कारच्या बाजारात आघाडी घेतलेल्या टाटाने सर्वात स्वस्त ईव्हीची किंमत वाढविली आहे. गेल्याच आठवड्यात टाटाने टियागो ईव्हीच्या डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली होती. यानंतर लगेचच किंमत वाढविण्याची घोषणा केली आहे. 

टाटा टियागो ईव्हीची किंमत २० हजार रुपयांनी वाढविण्यात आली आहे. आता ही ईलेक्ट्रीक कार 8.69 लाख रूपयांपासून मिळणार आगहे. सर्व व्हेरिअंटच्या किंमती २० हजारांनी वाढविल्या आहेत. 

टाटा टियागो ईव्ही ही देशातील ‘फास्‍टेट बुक ईव्‍ही’ बनली होती. पहिल्याच दिवशी १० हजार युनिट्स बुक करण्यात आले होते. महिन्याभरात हा टप्पा २० हजारांवर गेला आहे. सुरूवातीची किंमत १० लाख रूपयांपेक्षा कमी ठेवण्यात टाटा यशस्वी ठरली आहे. 

टाटा मोटर्सने (Tata Motors) ऑक्टोबर 2022 मध्ये आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) लाँच केली होती. त्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये ठेवण्यात आली होती. या किमतीचा लाभ पहिल्या 20 हजार ग्राहकांनाच मिळणार होता. 

बॅटरी पॅक आणि रेंजटाटा टियागो ईव्ही  XE, XT, XZ+ आणि XZ+ Tech Lux या चार ट्रिममध्ये येते. कारला बॅटरी पॅक आणि चार्जिंग ऑप्शनच्या आधारावर विभागले गेले आहेत. यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन 19.2kWh आणि 24kWh आहेत. 19.2 kWh ची बॅटरी फूल चार्ज केल्यावर 250 किमी पर्यंतची रेंज देते, तर मोठा बॅटरी पॅक फूल चार्ज केल्यावर 315 किमी पर्यंत रेंज देते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर