Tata Sierra Launch: ९० च्या दशकातील एसयूव्ही (SUV) म्हणजे ताकद, स्टाइल आणि रुबाब. याच भावना देणाऱ्या आणि बहुप्रतिक्षित 'टाटा सिएरा'ने २२ वर्षांनंतर भारतीय बाजारात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. टाटा मोटर्सनं २५ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ही एसयूव्ही लाँच केली.
किंमत, बुकिंग आणि इंजिन पर्याय
आकर्षक लुक आणि शक्तिशाली इंजिन असलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ११.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. ही 'इन्ट्रोडक्टरी प्राईज' (Introductory Price) असल्यानं भविष्यात दरात वाढ होण्याची शक्यता आहे. टाटा सिएरासाठी बुकिंग १६ डिसेंबरपासून सुरू होईल आणि एसयूव्हीची डिलिव्हरी १५ जानेवारी २०२६ पासून सुरू केली जाणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं.
इंजिन आणि पॉवरट्रेन
टाटा सिएरा एकूण ३ वेगवेगळ्या इंजिनसह ६ पॉवरट्रेन पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. यात दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिनचा समावेश आहे.
| इंजिन | फ्युएल | क्षमता (लिटर) | पॉवर (पीएस) | टॉर्क (एनएम) |
| हायपेरिएन | पेट्रोल | १.५ | १६० | २५५ |
| रेवोट्रॉन | पेट्रोल | १.५ | १०४ | १४५ |
| कायरोजेट | डिझेल | १.५ | ११८ | २०० |
१९९१ मध्ये जेव्हा सिएरा पहिल्यांदा लॉन्च झाली, तेव्हा कदाचित भारत तिच्यासाठी तयार नव्हता, पण आता "भारत टाटा सिएरासाठी तयार आहे," अशी प्रतिक्रिया कंपनीचे सीईओ शैलेश चंद्रा यांनी दिली.
खास फीचर्स आणि डिझाइन
लूक आणि डिझाइन: नवीन टाटा सिएराचा 'स्टान्स' मजबूत आणि उंच आहे, ज्यामुळे तिला प्रीमियम आणि पॉवरफुल लुक मिळतो. पुढील बाजूस पूर्ण रुंदीमध्ये एलईडी डीआरएल, क्लोज्ड ग्रिलवर टाटाचा लोगो आणि खालच्या बाजूस हेडलाइट्स देण्यात आले आहेत. एसयूव्हीची बॉक्सी डिझाइन आणि मागील बाजूस असलेलं ग्लास पॅनल जुन्या सिएरा मॉडेलची आठवण करून देतो. मागील बाजूस 'एंड टू एंड' कनेक्टेड एलईडी टेललॅम्प्स आणि 'SIERRA' बॅजिंग आहे.
केबिन आणि जागा: या एसयूव्हीमध्ये ६२२ लिटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. केबिनमध्ये ट्रिपल-स्क्रीन सेटअप (ड्रायव्हर डिस्प्ले, इन्फोटेनमेंट आणि पॅसेंजर स्क्रीन) उपलब्ध आहे. सिएरामध्ये 'कमांड सीटिंग पोझिशन' असून मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीला पुरेसा लेगरूम मिळावा यासाठी बूट स्पेसशी तडजोड न करता पुढे आणि मागील सीटमध्ये ३१६ मिमी 'गँगवे स्पेस'देखील देण्यात आलाय.
आधुनिक तंत्रज्ञान
डिस्प्ले: १०.२५ इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, १२.३ इंच मोठी सेंट्रल टचस्क्रीन आणि १२.३ इंच पॅसेंजर स्क्रीन (वायरलेस हेडफोनसह) या कारमध्ये मिळणार आहे.
ऑडिओ: या कारमध्ये १२ स्पीकरची जेबीएल साउंड सिस्टीम (JBL Sound System) आणि डॅशबोर्ड-माउंटेड साउंड बार (डॉल्बी ॲटमॉस सराउंड साउंड टेक्नॉलॉजीसह) देण्यात आलेय.
अन्य फीचर्स: याशिवाय वायरलेस ॲपल कार प्ले आणि ॲन्ड्रॉइड ऑटो सपोर्ट, हेड-अप डिस्प्ले, ॲम्बियंट लाइट्स, डुअल-झोन एसी, वायरलेस फोन चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि ड्रायव्हर सीटसाठी पावर्ड ॲडजस्टमेंटसारखे फीचर्सही यात मिळतील.
ड्रायव्हिंग: ड्रायव्हिंगचा अनुभव सुधारण्यासाठी यात दोन ड्राइव्ह मोड आणि तीन टेरेन मोड देण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने कोणते फीचर्स?
स्टँडर्ड फीचर्स: ६ एअरबॅग्ज, आयएसओफिक्स सीट ॲन्कर्स (ISOFIX), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि सर्व चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आलेत.
प्रिमियम सेफ्टी: याशिवाय यात ३६०-डिग्री कॅमेरा सेटअप, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, एबीएससह ईबीडी, हिल-होल्ड आणि २२ फीचर्ससह लेवल २+ एडीएएस (ADAS) देण्यात आलंय.
क्रॅश टेस्ट: भारत NCAP नं (New Car Assessment Program) क्रॅश टेस्ट केलेल्या इतर नऊ टाटा मॉडेल्सप्रमाणेच, नवीन सिएरालाही ५-स्टार रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे.
Web Summary : Tata Sierra relaunched after 22 years, priced from ₹11.49 lakh. Bookings start December 16, deliveries January 15, 2026. It offers multiple engine options, advanced features like triple-screen setup, JBL sound, and Level 2+ ADAS. Expect a 5-star safety rating.
Web Summary : टाटा सिएरा 22 साल बाद फिर से लॉन्च, कीमत ₹11.49 लाख से शुरू। बुकिंग 16 दिसंबर से शुरू, डिलीवरी 15 जनवरी, 2026 से। इसमें कई इंजन विकल्प, ट्रिपल-स्क्रीन सेटअप, जेबीएल साउंड और लेवल 2+ एडीएएस जैसी आधुनिक सुविधाएँ हैं। 5-स्टार सुरक्षा रेटिंग की उम्मीद है।