Tata Punch किती सुरक्षित? GNCAP रेटिंग किती? आकडा लीक झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:28 PM2021-10-11T19:28:17+5:302021-10-11T19:28:52+5:30

How safe is Tata Punch? पंच छोटी असली तरी ती जोरदार दणका देणारी ठरणार आहे. टाटाच्या ताफ्यात सध्या दोन फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत.

Tata Punch Gets 5-star GNCAP safety rating as Nexon, Altroz; Data leak | Tata Punch किती सुरक्षित? GNCAP रेटिंग किती? आकडा लीक झाला

Tata Punch किती सुरक्षित? GNCAP रेटिंग किती? आकडा लीक झाला

Next

टाटा मोटर्सने काही दिवसांपूर्वीच Tata Punch ही मायक्रो एसयुव्ही लाँच केली आहे. कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. परंतू या कारचे रिव्ह्यू येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच अधिकृत बुकिंगही घेण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. परंतू ही कार किती सुरक्षित आहे, याबाबत काही सुगावा लागला आहे. सेफ्टी रेटिंगबाबत (What is the GNCAP rating?) आकडा लीक झाला आहे. 

टाटाच्या ताफ्यात सध्या दोन फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत. या रेटिंग ग्लोबल एनकॅपने दिलेल्या आहेत. नेक्सॉन या कॉम्पॅक्ट एसयुव्ही नंतर हॅचबॅक कार अल्टॉझने फाईव्ह स्टार रेटिंग मिळविल्या आहेत. यामुळे टाटाची पंच देखील या पंक्तीत जाऊन बसणार की नाही यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. कंपनीनुसार या कारची सेफ्टी रेटिंग आणि किंमत लाँचिंगवेळीच जाहीर करणार आहेत. 

परंतू लाँचिंगआधीच टाटा पंचच्या सेफ्टी रेटिंगची माहिती टाटाच्या वेबसाईटवरून लीक झाली आहे. पंच छोटी असली तरी ती जोरदार दणका देणारी ठरणार आहे. या कारला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. या Tata Punch ची विक्री 20 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. याची अंदाजे किंमत 5.5 लाख ते 8 लाख रुपये असेल. पंचला अल्फा प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आले आहे. यावरच अल्ट्रूझ बनली आहे. 

यानंतर टियागोला ४ स्टार रेटिंग मिळाली आहे. ४ स्टारमध्ये मारुतीची फक्त ब्रेझा आहे. महिंद्राच्या एका कारला ५ स्टार रेटिंग आहे. नेक्सॉन ही पहिली भारतीय कार आहे, जिला ग्लोबल एनकॅपची 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. टाटाच्या वेबसाईटवर बुकिंगवेळीच फोटोवर कंपनीने फाईव्ह स्टार रेटिंगचा खुलासा केला होता. परंतू नंतर हे लक्षात आल्यावर तो फोटो हटविण्यात आला. 

Web Title: Tata Punch Gets 5-star GNCAP safety rating as Nexon, Altroz; Data leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा