शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

'नवीन गाडी द्या किंवा पैसे परत करा...! डिलिव्हरीच्या 10 तासानंतर बंद पडली Nexon EV

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 14:00 IST

Tata Nexon EV: नवीन गाडी बंद पडल्यामुळे ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून थेट कंपनीकडे मदत मागितली.

Tata Motors: टाटा मोटर्स देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, टाटानेही आपल्या अनेक गाड्यांचे इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहेत. Tata Nexon EV ही टाटाची सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. पण, सध्या याबाबत एक अशी तक्रार समोर आली आहे, ज्यामुळे टाटा इलेक्ट्रिक कारच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. 

काय आहे संपूर्ण प्रकरण:मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील एका व्यक्तीने सोशल नेटवर्किंग साइट 'X' (ट्विटर) वर त्याला आलेला Nexon EV चा  अनुभव शेअर केला आहे. नेक्सॉन ईव्हीच्या डिलिव्हरीनंतर अवघ्या 10-12 तासात कार बंद पडल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, अहमदाबादचे रहिवासी जितेंद्र एच. चोप्रा यांनी अलीकडेच नवीन Tata Nexon EV घेतली. जितेंद्र यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, "आम्ही 14 जुलै 2023 रोजी दुपारी 1.30 वाजता टाटा डीलर प्रोग्रेसिव्ह कार्स, अहमदाबाद कडून टाटा नेक्सॉन ईव्हीची डिलिव्हरी घेतली. दहा तासांनंतर आणि फक्त 15-20 किमी चालल्यानंतर नवीन कार रात्री 11 च्या सुमारास अचानक बंद पडली. यानंतर आम्ही कार डीलरकडे परत केली."

"डीलरने आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितले की, यातील PSA नावाचा मुख्य भाग आम्ही बदलला आहे. पण, अवघ्या 10 तासांनंतर बिघाडणारी गाडी मला नको होती, म्हणून मी त्यांना नवीन वाहन देण्याची किंवा पैसे परत करण्याची विनंती केली. मानसिकदृष्ट्या मी हे बिघडलेली गाडी चालविण्यास तयार नाही. डीलर आणि टाटा मोटर्सचे अधिकारी मला दोनदा भेटले आणि त्यांनी मला या वाहनाच्या डिलिव्हरीसोबत इतर काही फायदे देऊ केले, पण मी त्यांना नकार दिला.

"आता अनेक दिवस होऊनही त्यांनी माझा समस्या सोडवली नाही. माझी कारही त्यांच्याकडेच आहे. त्यांनी मला फक्त एक मेल पाठवून गाडी घेऊन जाण्यास सांगितले आहे. पण, मला बिघडलेली गाडी नकोय. टाटाने मला मीडिया आणि सोशल मीडियावर ही माहिती शेअर करण्यास भाग पाडले. हे वाचून टाटातील लोक मला मदत करतील अशी आशा आहे, " अशी माहिती जितेंद्र यांनी दिली. या ट्विटमध्ये त्यांनी टाटा मोटर्सला टॅगही केले आहे. पण, अद्याप टाटा मोटर्सकडून याप्रकरणी कोणतेही अधिकृत विधान जारी करण्यात आलेले नाही.

ही पहिलीच घटना नाहीTata Nexon EV मध्ये तांत्रिक बिघाड होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी असाच काहीसा प्रकार मुंबईत राहणार्‍या कार्मेलिता फर्नांडिस यांच्यासोबत घडला आहे. त्यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात Nexon EV प्राइमची बुकिंग केली होती. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात कारची डिलिव्हरी मिळाली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते, पण अचानक त्यांच्या कारची बॅटरी डाऊन झाली आणि गाडी बंद पडली. त्यांनीही सोशल मीडियावर या प्रकरणाची तक्रार केली होती. घ्या." 

टॅग्स :TataटाटाcarकारElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन