शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

टाटांचा फोर्डवर आणखी एक उपकार! सानंदचा प्लांट विकत घेणार; वर्षाला दोन लाख इलेक्ट्रीक कार बनविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 18:05 IST

Tata To Ford Second Time: टाटा मोटर्स सध्याच्या घडीला ईव्ही कार या नॅनोच्या प्रकल्पात बनवित आहे. टाटा नॅनो फेल गेल्याने त्या प्लांटचा वापर इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी करण्यात येत आहे. परंतू आता मागणी वाढू लागली आहे.

टाटा मोटर्सने इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात भक्कम पाऊल रोवण्याकडे पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. यासाठी फोर्ड इंडियाचा सानंद येथील बंद पडलेला वाहन निर्मिती प्रकल्प विकत घेण्याची तयारी दर्शविली आहे. यामध्ये कंपनी सुमारे २००० कोटी रुपये गुंतविणार असून २०२६ पर्यंत कंपनी या प्रकल्पातून दोन लाख ईव्ही बनविणार आहे. 

टाटाच्या इलेक्ट्रीक गाड्यांना आता मागणी वाढू लागली आहे. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांच्या उत्पादनासह टाटा त्याच्या ताफ्यातील सर्वच कारची इलेक्ट्रीक मॉडेल आणण्याच्या विचारात आहे. अशावेळी टाटाला मनुष्यबळ आणि प्रकल्पाची गरज भासणार आहे. अशातच फोर्डचा तयार प्रकल्प हाती आल्यास टाटाचे निम्मे काम होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा मोटर्सने गुजरात सरकारला आश्वासन दिले आहे. 

फोर्ड इंडियाच्या सानंद येथील प्रकल्पातील कोणत्याही कर्मचाऱ्याला काढून टाकले जाणार नाही. तसेच जमीन हस्तांतरण शुल्कात सूट द्यावी, यासाठी आम्ही २० टक्के कर भरण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. याचसोबत कंपनीने फोर्डला जो २०३० पर्यंत इन्सेंटिव्ह देण्यात येत होता, तो देखील देण्याची मागणी करण्यात आली आहे. या व्यवहाराशी संबंधीत सूत्राने म्हटले आहे की, सरकारने टाटा मोटर्सच्या या मागण्या मान्य केल्या आहेत. 

टाटा मोटर्स सध्याच्या घडीला ईव्ही कार या नॅनोच्या प्रकल्पात बनवित आहे. टाटा नॅनो फेल गेल्याने त्या प्लांटचा वापर इलेक्ट्रीक कार बनविण्यासाठी करण्यात येत आहे. परंतू आता मागणी वाढू लागली आहे. यामुळे टाटाला वर्षाला आणखी दोन लाख ईव्ही बनवाव्या लागणार आहेत. यामुळे  23,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

फोर्डच्या प्रकल्पाची क्षमता कीती...फोर्ड मोटर कंपनीने  वर्षाला सुमारे 2.4 लाख कार आणि 2.7 लाख इंजिन तयार करण्याची क्षमता असलेला प्लांट उभारला होता. यासाठी 4,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परंतू, गेल्याच वर्षी फोर्डने भारतातून एक्झिट घेतली. फोर्डने गेल्या दशकभरात कंपनीला दोन अब्ज डॉलर्सचा तोटा झाल्याचे म्हटले होते. परंतू आधीच्या ग्राहकांना सेवा देत राहणार असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :TataटाटाFordफोर्ड