शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्सकडून नवीन नेक्सॉन फेसलिफ्टसाठी बुकिंग सुरू, 'या' दिवशी होणार लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:36 IST

ग्राहक ही एसयूव्ही ऑनलाइन किंवा टाटा मोटर्सच्या अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करू शकतात.

नवी दिल्ली : टाटा मोटर्सने अधिकृतपणे आपल्या नवीन नेक्सॉन फेसलिफ्ट एसयूव्हीसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. ग्राहक ही एसयूव्ही ऑनलाइन किंवा टाटा मोटर्सच्या अधिकृत डीलरशिपद्वारे बुक करू शकतात. कंपनी ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही 14 सप्टेंबरला लाँच करणार आहे. तर या कारचे इलेक्ट्रिक मॉडेल 7 सप्टेंबरला रोजी लाँच होणार आहे. 

डिझाईन 2023 टाटा नेक्सॉन स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह आणि फेअरलेस अशा 4 ट्रिम लेव्हलमध्ये आणले जाणार आहे. नवीन मॉडेलमध्ये अनेक डिझाईन अपडेट्स आणि नवीन इंटीरियर मिळते. मात्र, कारच्या इंजिन ऑप्सनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या एसयूव्हीला एक नवीन फ्रंट फॅसिआ देण्यात आला आहे, जो 2023 ऑटो एक्सपोमध्ये अनावरण केलेल्या कर्व्ह एसूव्हीवरून प्रेरित आहे. यामध्ये एक स्मूथ ग्रिल, एलईडी डीआरएल आणि खालच्या बंपरवर व्हर्टिकल स्टॅक्ड एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत. यामध्ये पूर्णपणे नवीन रीअर प्रोफाइल मिळते, ज्यामुळे नवीन टेलगेट आणि कनेक्ट केलेल्या लाइट बारसह नवीन एलईडी टेल-लाइट्स देखील मिळतात.

इंटीरियर आणि फीचर्सटाटा नेक्सॉनला पूर्णतः अपडेटेड डॅशबोर्ड लेआउट आणि नवीन इंटीरियर स्कीमसह संपूर्ण नवीन इंटीरियर लेआउट मिळतो. याला टाटा लोगोसह एक नवीन 2-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील मिळते. या एसयूव्हीमध्ये एक अपडेट अपहोलस्ट्री आणि क्लायमेट कंट्रोल, लॉक आणि अनलॉक बटणांसाठी अपडेटेड अपहोल्स्ट्री आणि टच-आधारित पॅनेल आहे. तसेच, या कारला 10.25-इंच फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay सह 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला आहे. याशिवाय, 6 एअरबॅग, 360 डिग्री कॅमेरा, ईबीडीसह एबीएस आणि फ्रंट पार्किंग सेन्सर सारखे सेफ्टी फीचर्स मिळतात.

इंजिन टाटा नेक्सॉनला दोन इंजिन ऑप्शनसह मार्केटमध्ये आणले जाणार आहे. यामध्ये एक 1.2-लीटर 3-सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि एक 1.5-लीटर 4-सिलिंडर टर्बो डिझेलचा समावेश आहे. जो अनुक्रमे 120 PS/170 Nm आणि 115PS/260 Nm चे आउटपुट जनरेट करतो. ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड AMT आणि 7-स्पीड DCT समाविष्ट आहे. डिझेलमध्ये 6 मॅन्युअल आणि एएमटीचा ऑप्शन मिळतो, तर पेट्रोल इंजिनसह 4 गिअरबॉक्सचा ऑप्शन देण्यात आला आहे. दरम्यान, किंमतीबाबत बोलायचे झाल्यास नवीन नेक्सॉनची किंमत 8 लाख ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. तसेच, ही एसयूव्ही Hyundai Venue, Kia Sonet, Mahindra XUV300 सारख्या सेगमेंटमधील इतर कारसोबत स्पर्धा करू शकते.

टॅग्स :TataटाटाcarकारAutomobileवाहन