शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

SUV बाजारात TATA Motors चा 'पंच'; पाहा नव्या कारची एक झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:59 IST

Tata Punch Micro SUV HBX: टाटा मोटर्सनं सोमवारी आपल्या मायक्रो एसयूव्हीची एक झलक सादर केली. ही सर्वात स्वस्त एसयूव्ही असू शकते, कारमध्ये देण्यात आले जबरदस्त फीचर्स.

ठळक मुद्देटाटा मोटर्सनं सोमवारी आपल्या मायक्रो एसयूव्हीची एक झलक सादर केली. ही सर्वात स्वस्त एसयूव्ही असू शकते, कारमध्ये देण्यात आले जबरदस्त फीचर्स.

Tata Punch Micro SUV HBX:  देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक TATA Motors नं सोमवारी आपली सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही TATA Punch देशांतर्गत बाजारात सादर केली. आतापर्यंत या कार एसयूव्हीला मीडिया रिपोर्टमध्ये 'एचबीएक्स' असे नाव दिले जात होते, परंतु आता कंपनीने ही कार पंच या नावानं सादर केली आहे. या एसयूव्हीचं कॉन्सेप्ट व्हर्जन कंपनीनं गेल्या ऑटो एक्स्पो दरम्यान सादर केलं होतं आणि त्याची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती.

टाटा पंच ही कंपनीची अशी पहिली एसयूव्ही आहे जी ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) वर तयार करण्यात आली आहे. ही एसयुव्ही कॉम्पॅक्ट 2.0 डिझाईन लँग्वेजसह डेव्हलप करण्यात आली आहे. या एसयुव्हीला कंपनीनं कॉम्पॅक्ट स्पोर्टी लूक दिला आहे, तसंच हा लूक तरूण वर्गाला पसंत येईल असंही म्हटलं जात आहे.

Tata Punch मध्ये केवळ कमी किंमतीत तुम्हाला स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल म्हणजेच एसयुव्हीचा फील मिळणार नाहीत, तर यामध्ये टाटा हॅरिअरप्रमाणे टाईम रनिंग लाईट्स (DRL's) आणि बॉनेट देण्यात आलं आहे. याचे आकर्षक अलॉय व्हिल्स साईड प्रोफाईललाही जबरदस्त बनवतात. साईजमध्ये भलेही ही एसयुव्ही छोटी असेल परंतु मोठी व्हिल आर्क ही कार प्रत्येक प्रकारच्या रोड कंडिशनवर धावण्यास मदत करतात.  

काय असू शकतात फीचर्स?कंपनीने अद्याप या एसयुव्हीच्या इंटिरियरविषयी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. परंतु जाणकारांच्या मते कंपनी या कारमध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्क्वेअर शेप एसी व्हेंटसह तीन-स्पोक फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल टॅकोमीटर आणि अॅनालॉग स्पीडोमीटर दिले जाऊ शकतात.

असं मानलं जात आहे की कंपनी या कारमझ्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देऊ शकतं, जे 83bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. कंपनी ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह देखील ही कार बाजारातही लाँच करू शकते.

 किती असू शकते किंमत?लाँच होण्यापूर्वी या कारच्या किंमतीबद्दल काहीही सांगणं कठीण आहे, परंतु रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की कंपनी या कारची किंमत 4 लाख ते 5 लाख रुपयांदरम्यान ठेवू शकते. बाजारात ही मायक्रो एसयूव्ही प्रामुख्याने Maruti Ignis आणि Hyundai च्या आगामी छोट्या एसयुव्ही Casper शी स्पर्धा करेल.

टॅग्स :TataटाटाcarकारMarutiमारुतीHyundaiह्युंदाईPetrolपेट्रोलIndiaभारत