शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Tata Buys Ford Sanand Manufacturing PLant: अपमानाचा आणखी एक बदला! रतन टाटांच्या कंपनीने फोर्डचा प्लांटच विकत घेतला; ईव्ही बनविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 13:30 IST

फोर्ड इंडियाकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 23000 कर्मचारी आहेत. टाटा मोटर्स या प्लांटमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे.

एकेकाळी टाटा मोटर्सचा पॅसेंजर कारचा बिझनेस विकत घ्या म्हणून रतन टाटाफोर्ड कंपनीच्या मालकाकडे गेले होते. परंतू त्यांना तेथून अपमानीत होऊन भारतात परतावे लागले होते. याच टाटांनी काही वर्षांपूर्वी फोर्डला डोईजड झालेली लँड रोव्हर कंपनीच विकत घेतली होती. आता पुन्हा एकदा टाटाने फोर्डवर उपकार केले आहेत. 

फोर्ड गेल्या वर्षीच भारतीय बाजारातून बाहेर पडली आहे. यामुळे फोर्डचे भारतातील दोन प्रकल्प असेच पडून आहेत. यापैकी एक विकण्याच्या प्रयत्नात फोर्ड होती. टाटासोबत याची चर्चाही सुरु होती. अखेर ती डील झाली आहे. टाटाने फोर्डचा सानंदमधील मॅन्युफॅक्टरिंग प्लांट विकत घेतला आहे. या प्लांटची 726 कोटी रुपयांना टाटाने खरेदी केली आहे. सानंदमध्ये टाटाचा आणखी एक प्लांट आहे. जिथे टाटा नॅनोचे उत्पादन होत होते. हा प्लांट फोर्डच्या प्लाँटच्या बरोबर समोरच होता. 

फोर्ड इंडियाकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 23000 कर्मचारी आहेत. टाटा मोटर्स या प्लांटमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यामुळे या लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. टाटाने गुजरात सरकारकडे जमीन हस्तांतरण शुल्कात सुट देण्याची मागणी केली आहे. टाटा मोटर्सने एकूण शुल्काच्या २० टक्के म्हणजेच ६६ कोटू रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गुजरात सरकारने हे मान्य केले आहे. 

2011 मध्ये फोर्डने सुमारे 8000 कोटी रुपये गुंतवून साणंदमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारला होता. जवळपास 10 वर्षात भारतीय बाजारपेठेत $2 अब्जांचे नुकसान सोसल्यावर फोर्डने सप्टेंबरमध्ये भारत सोडण्याचा निर्णय घेतला. फोर्ड इकोस्पोर्ट ही निर्यात होणारी शेवटची कार गेल्या महिन्यात तयार झाली. सानंद प्लांटमध्ये दरवर्षी 3 लाख ते 4.2 लाख कारचे उत्पादन होऊ शकते. आता येथे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (TPEML) आपली इलेक्ट्रिक वाहने तयार करेल.

टॅग्स :TataटाटाFordफोर्ड