टाटा हॅरियर फेसलिफ्ट खरेदी करण्याचा प्लॅन आहे? जाणून घ्या, 'या' 10 शहरातील किमती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 01:58 PM2023-10-23T13:58:17+5:302023-10-23T14:01:21+5:30

देशातील दहा शहरांमध्ये टाटा हॅरियर फेसलिफ्टच्या ऑन-रोड किमतींबद्दल माहिती जाणून घ्या.

tata harrier facelift on road prices in top 10 cities in india | टाटा हॅरियर फेसलिफ्ट खरेदी करण्याचा प्लॅन आहे? जाणून घ्या, 'या' 10 शहरातील किमती

टाटा हॅरियर फेसलिफ्ट खरेदी करण्याचा प्लॅन आहे? जाणून घ्या, 'या' 10 शहरातील किमती

नवी दिल्ली : सध्या फेस्टिव्हल सीजन सुरु आहे. दरम्यान, अलिकडेच नवीन 2023 टाटा हॅरियर फेसलिफ्ट अधिकृतपणे करण्यात लाँच आली आहे. जर तुम्ही 2023 टाटा हॅरियर फेसलिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या कारची ऑनलाइन किंमत जाणून घेऊ शकता. तसेच, ही कार स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि फियरलेस या चार ट्रिम लेव्हलमध्ये मिळणार आहे. 

याशिवाय, देशातील दहा शहरांमध्ये टाटा हॅरियर फेसलिफ्टच्या ऑन-रोड किमतींबद्दल माहिती जाणून घ्या. नवीन हॅरियर मॅन्युअलची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.49 लाख रुपयांपर्यंत जाते, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट आणि डार्क एडिशनची किंमत 19.99 लाख रुपयांपासून सुरू होते. मध्यम आकाराच्या एसयूव्हीचे नवीन व्हर्जन सात कलरच्या ऑप्शनमध्ये आणि 10 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 

दरम्यान, नवीन हॅरियर बुक करण्याची योजना आखत असलेल्या ग्राहकांना सहा ते आठ आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी अपेक्षित आहे, कारण पुढील महिन्यात वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. या किमतीत हॅरियर जीप कंपास आणि एमजी हेक्टर सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

इंजिन
कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 2.0L टर्बो डिझेल इंजिन असेल, जे प्री-फेसलिफ्ट व्हर्जनमधून घेतले गेले आहे. इंजिन हे 170PS पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. खरेदीदारांना 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. ऑटोमेटिक व्हेरिएंटमध्ये पॅडल शिफ्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील मिळत आहे. अपडेटेड हॅरियर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह अनुक्रमे 16.08kmpl आणि 14.60kmpl मायलेज देऊ शकते, असा टाटा कंपनीचा दावा आहे.

फीचर्स
नवीन टाटा हॅरियर फेसलिफ्टच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत. यात आता लेटेस्ट स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी पर्यायांसह एक मोठी 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यासोबतच 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. यात 4-स्पोक स्टीयरिंग व्हील आहे, ज्यामध्ये बॅकलिट टाटा लोगो आहे. तसेच, कारमध्ये दोन टॉगलसह नवीन टच-आधारित हवामान नियंत्रण पॅनेल आहे. याशिवाय, डॅशबोर्डला लेदरेट पॅडिंग आणि ग्लॉसी ब्लॅक सरफेससह फ्रेश फिनिश देण्यात आले आहे. याशिवाय अनेक फीचर्स आहेत.

शहर              बेस व्हेरिएंट                         टॉप व्हेरिएंट

मुंबई              Rs. 18.91 lakh               Rs. 32.23 lakh

दिल्ली            Rs. 18.67 lakh               Rs. 31.52 lakh

बंगलुरू          Rs. 19.34 lakh               Rs. 32.95 lakh

कोलकाता       Rs. 18.25 lakh               Rs. 30.82 lakh

हैदराबाद        Rs. 19.33 lakh               Rs. 32.94 lakh

चेन्नई             Rs. 19.04 lakh                Rs. 32.16 lakh

लखनऊ         Rs. 18.23 lakh                Rs. 30.79 lakh

अहमदाबाद    Rs. 17.63 lakh                Rs. 29.76 lakh

इंदूर             Rs. 18.54 lakh                 Rs. 32.38 lakh

जयपूर           Rs. 18.38 lakh                 Rs. 31.06 lakh

Web Title: tata harrier facelift on road prices in top 10 cities in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.