शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

टाटा मोटर्स आणणार नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही; जाणून घ्या Curvv, Harrier आणि Sierra EV ची लाँच टाइमलाइन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 14:53 IST

कंपनी आपली ईव्ही लीडरशिप टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

नवी दिल्ली : सध्या देशातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. भारतात टाटा मोटर्स ही सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी आहे. दरम्यान, कंपनी आपली ईव्ही लीडरशिप टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. पुढील दोन वर्षांत अनेक नवीन वाहने लाँच करण्याची योजना आखत आहे. यानुसार, सर्वात आधी कर्व्ह ईव्ही येणार आहे, जी इतरांप्रमाणेच अॅक्टी. ईवी आर्किटेक्चरवर आधारित असणार आहे. याचा अर्थ यात समोर आणि मॉड्यूलर इंटीरियरसह अधिक फीचर्स असतील.

टाटा कर्व्ह सर्वात आधी येईलया सणासुदीच्या हंगामात पहिल्यांदा टाटाचे कर्व्ह ईव्ही व्हर्जन लाँच होणार आहे. टाटा कर्व्ह एक टिप ऑफ आइसबर्ग असेल, कारण टाटा मोटर्सने या सेगमेंटमध्ये एक नव्हे तर आणखी तीन ईव्ही आणण्याची योजना आखली आहे.

टाटा हॅरियर ईव्ही पुढील वर्षी लाँच होणारटाटा कंपनी पुढील वर्षी हॅरियर ईव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारत मोबिलिटी शोमध्ये कार जवळजवळ प्रोडक्शन रेडी व्हर्जनमध्ये दिसून आली आहे. ही कार Acti.EV प्लॅटफॉर्मवर देखील आधारित असणार आहे. तसेच, कर्व्हपेक्षा मोठी असल्यामुळे कारची रेंज जास्त असणे अपेक्षित आहे. या कारला ६० kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे, जी सुमारे ५०० किमीची रेंज देऊ शकते. हॅरियर ईव्हीमध्ये V२V आणि V२L फीचर्ससह फ्रंक असणे अपेक्षित आहे. तसेच, यात ड्युअल मोटर लेआउट असेल आणि सर्व व्हील ड्राइव्ह सिस्टमने असेल. डिझाइनच्या बाबतीत, हॅरियर ईव्हीला स्पेसिफिक खास डिझाइन टच देखील मिळेल.

टाटा सिएरा शेवटी येईलहॅरियर ईव्ही लाँच झाल्यानंतर Sierra.ev बाजारात आणण्याची शक्यता आहे. सिएरा ईव्ही ही फ्लॅगशिप एसयूव्ही असेल. ही कार ५ डोअर कार असेल पण फ्युचरिस्टिक डिटेलिंगसोबतच टच सारख्या काही कॉन्सेप्टही यात पाहायला मिळतील. लाउंज सारखे वातावरण कायम ठेवताना ब्लॅक आऊट पिलर देखील एक शानदार टच आहेत. टाटा मोटर्स ड्युअल मोटर्स आणि अनेक फीचर्ससह ही ईव्ही आणणार आहे.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार