शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

क्रॅश टेस्टमध्ये TATA चा बोलबाला; Nexon EV आणि Punch EV ला मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 18:32 IST

ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये चांगली रेटिंग्स मिळवल्यानंतर, आता भारत NCAP चाचणीमध्येही टाटाच्या EV कार्सनी चांगली कामगिरी केली आहे.

Tata Cars Bharat NCAP Crash Test : सध्या भारतात TATA च्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. याचे कारण म्हणजे, टाटाच्या गाड्या अतिशय मजबूत आहेत. विशेष म्हणजे, ग्लोबल NCAP कार क्रॅश चाचणीमध्ये कंपनीच्या गाड्यांनी चांगली रेटिंग्स मिळवल्यानंतर, आता भारत NCAP चाचणीमध्येही टाटाच्या EV कार्सनी चांगली कामगिरी केली आहे. Tata Nexon EV आणि Tata Punch EV यांना भारत NCAP क्रॅश चाचणीत 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. या दोन्ही कार्सने अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये ही रेटिंग मिळाली आहे. 

Nexon EV मध्ये फ्रंटल-साइड हेड कर्टेन, साइड चेस्ट एअरबॅग, बेल्ट रिमाइंडर, Isofix अँकर पॉइंट्स आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतात. तर Punch EV मध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, Isofix माउंट, 6 एअरबॅग्ज, सर्व सीटसाठी थ्री पॉइंट सीट बेल्ट, यांसारखे सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतात.

Nexon EV अडल्ट सुरक्षेत Nexon EV ला 32 पैकी 29.86 गुण मिळाले आहेत, तर चाईल्ड सुरक्षेत 24 पैकी 23.95 गुण मिळाले आहेत. फ्रंटल टेस्टमध्ये कारला 16 पैकी 14.26 , तर साइड टेस्टिंगमध्ये 16 पैकी 15.60 गुण मिळाले आहेत. चाईल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये कारला CRS साठी 12 पैकी 12 गुण मिळाले आहेत, तर  व्हिएकल असेसमेंटसाठी 13 पैकी 9 गुण मिळाले आहेत.

Punch EV अडल्ट सुरक्षेत Punch EV ला 32 पैकी 31.46 गुण मिळाले आहेत, तर चाईल्ड सुरक्षित 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. फ्रंटल टेस्टिंगमध्ये 14.26 पॉइंट्स आणि साइड टेस्टिंगसाठी 15.6 पॉइंट मिळाले आहेत. याशिवाय, चाईल्ड ऑक्येपेंट प्रोटेक्शनमध्ये 24 पैकी 23.95 गुण मिळाले आहेत.

Nexon EV आणि Punch EV ची रेंज Tata Nexon EV दोन प्रकारात येते. याचे मेडियम मॉडेल 30kWh बॅटरी पॅकसह येते, ज्याची रेंज 325 किलोमीटरपर्यंत आहे. तर, लाँग रेंज मॉडेल 40.5kWh बॅटरी पॅकसह येते, ज्याची रेंज 465 किलोमीटरपर्यंत आहे. पंच EV देखील दोन पर्यायांमध्ये येते. याचे 24kWh बॅटरी पॅक मॉडेल 315 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, तर 35kWh बॅटरी पॅक 421 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

Nexon EV आणि Punch EV ची किंमतनेक्सॉन इलेक्ट्रिकची किंमत 14.49 लाख ते 19.49 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तर पंच EV ची किंमत 10.99 लाख ते 15.49 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.

टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobile Industryवाहन उद्योग