Tata Altroz DCA 2022: जगात पहिली! टाटा अल्ट्रॉझमध्ये आली अत्याधुनिक गिअर सिस्टिम; ट्रेनमध्ये होतो वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:00 PM2022-03-21T15:00:40+5:302022-03-21T15:01:47+5:30

Tata Altroz DCA world class features: बाहेरून टाटाने या कारमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. मात्र, आत मोठे बदल केलेले आहेत. टाटा अल्ट्रॉझमध्ये १.२ लीटर रेवट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

Tata Altroz DCT 2022 automatic launched at Rs 8.10 lakh, worlds first car with planetary gearbox; Used in trains | Tata Altroz DCA 2022: जगात पहिली! टाटा अल्ट्रॉझमध्ये आली अत्याधुनिक गिअर सिस्टिम; ट्रेनमध्ये होतो वापर

Tata Altroz DCA 2022: जगात पहिली! टाटा अल्ट्रॉझमध्ये आली अत्याधुनिक गिअर सिस्टिम; ट्रेनमध्ये होतो वापर

googlenewsNext

टाटा मोटर्सने आज फाईव्ह स्टार सेफ्टी असलेली भारताची पहिली हॅचबॅक कार टाटा अल्ट्रॉझ अॅटोमॅटीक कार लाँच केली आहे. मॅन्युअल गिअरची कार दोन वर्षांपूर्वी लाँच केली होती. विलंब झालेला असला तरी अत्याधुनिक गिअरबॉक्स देणारी जगातील ही पहिली आणि एकमेव कार बनली आहे. महत्वाचे म्हणजे हा गिअरबॉ़क्स भारतीयांच्या सवयीप्रमाणे तयार करण्यात आला आहे. 

टाटा अल्ट्रॉझ डीसीए (tata altroz DCA) मॉडेलची एक्स शोरुम किंमत 8.1 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारमध्ये खूप चांगली फिचर्स आहेत, याचबरोबर ऑटोमॅटिक ट्रांसमिशन ग्राहकांचे लक्ष वेधून घेणार आहे. या गिअरबॉक्समध्ये प्लेनेटरी गिअर सिस्टिम देण्यात आली आहे. एवढेच नाही तर या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच वेट क्लचसोबत अॅक्टिव्ह कुलिंग टेक्निक, मशीन लर्निंग, शिफ्ट बाय वायर तंत्रज्ञान, सेल्फ हिलिंग मेकॅनिझम आणि ऑटो पार्क लॉक देण्यात आला आहे. 

टाटा अल्ट्रॉझमध्ये १.२ लीटर रेवट्रॉन पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार चार मॉडेलमध्ये येते. यामध्ये एक्सएम प्लस, एक्सटी, एक्सझेड और एक्सझेड प्लस असे व्हेरिअंट आहेत. टॉप मॉडेलची किंमत 9.89 लाख लाखांवर जाते. ही कार ऑप्रा ब्लू, डाउनटाउन रेड, आर्केड ग्रे, एवेन्यू व्हाइट आणि हार्बर ब्लू रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. 

बाहेरून टाटाने या कारमध्ये फारसे बदल केलेले नाहीत. मात्र, आत मोठे बदल केलेले आहेत. प्रीमियम लेदर सीट्स, ऑटो हेडलैंप्स, हार्मन 7-इंच टचस्क्रीन, 7-इंच का टीएफटी डिजिटल क्लस्टर, रियर एसी वेंट्स आदी देण्यात आलेले आहेत. 

प्लेनेटरी गिअर सिस्टिम कसे काम करते?
साधारणपणे आपण गिअर चेंज करतो तेव्हा गाडीचा वेग कमी किंवा जास्त होतो. ही सामान्य गिअर सिस्टिम झाली. प्लेनेटरी गिअर सिस्टिम जेव्हा आपण गिअर टाकतो तेव्हा आधीचा टॉर्क तसाच ठेवते यामुळे गाडीचा वेग कमी जास्त होत नाही. याचा वापर इंधन वाचविण्यासाठी तसेच इंजिनवरील ताण कमी करण्यासाठी होतो. ही यंत्रणा ट्रेनमध्ये वापरण्यात येते. 

Web Title: Tata Altroz DCT 2022 automatic launched at Rs 8.10 lakh, worlds first car with planetary gearbox; Used in trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा