शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पावसापासून बचाव करणारे हेडलॅम्पवरील प्लॅस्टिक कव्हरापासून जरा दूरच राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:27 AM

मोटारसायकल व स्कूटरला पावसाळ्यात लावे जाणारे हॅण्डलकव्हर हेडलॅम्पला त्याच्या संलग्न प्लॅस्टिकने झाकते. मात्र यापासून हेडलॅम्पच्या काचेला चरे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी वस्तू घेताना पूर्ण व्यवहारिक दृष्टी ठेवूनच घ्यावी.

मुंबईत पावसाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याशिवाय स्कूटर वा मोटारसायकलसाठी वेगवेगळ्या अॅक्सेसरीज विकत घेण्याची तयारी काही सुरू होत नाही. पावसापासून मोटारसायकलीच्या, स्कूटर्स यांच्या रक्षणार्थ वेगवेगळ्या प्रकारची कव्हर्स घेण्यासाठी बाजारात अगदी रांग लागलेली असते. शहरांमध्ये हे प्रकार सर्रास असून त्यासाठी प्रत्येक शहरात एक ठरलेली बाजारपेठ असते. दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला त्या त्या भागामध्ये दिसणारी प्रत्येक बाईकवाल्याची लगबग म्हणजे शाळेतील पहिल्या दिवसासारखी वाटते. मोटारसायकलीच्या व स्कूटरीच्या हेडलॅम्प प्लॅस्टिक कव्हरचे एक मोठे शिवलेले आच्छादन येते, काहीजण त्याला हॅण्डलकव्हरही म्हणतात. हे जुन्या प्रकारातील कव्हर असून आजही ते अनेकजण वापरतात. दोरीने दोन्ही बाजूला ते बांधले जाते व हेडलॅम्पलाही दोरीने हे कव्हर गाठमारून किंवा इलेस्टिक दोरीने बांधण्याची सोय याला असते.  त्यामुळे तुमचे दोन्ही हॅण्डलग्रीप, आरसे व हेडलॅम्प पावसाच्या थेट पाण्यापासून वाचतात... ( असा एक समज आहे) त्यामुळे एक्सरेटर पाणी जाऊन घट्ट होत नाही, क्लच दाबणे सुलभ राहाते, हॅण्डब्रेक्सही घट्ट होत नाही. कारण त्यात पावसाचे पाणी जात नाही. या समजापर्यंत सारे ठीक आहे. पण हेडलॅम्पमध्ये पावसाचे पाणी जात नसूनही या कव्हरामुळे मात्र तो हेडलॅम्प झाकला जातो. पारदर्शक प्लॅस्टिकमुळे त्याच्यातून प्रकाश आरपार होतो खरा पण त्यामुळे बरेच तोटे तुम्हाला सोसावे लागतात, ही बाब अनेकांच्या लक्षात येत नाही.वास्तविक मोटारसायकल वा स्कूटरसाठी कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त अॅक्सेसरीज घेताना खूप जपून घ्याव्यात. अनेकदा त्या वस्तू नेमक्या कोणत्या दर्जाच्या आहेत, ते समजू शकत नाही. त्यांची विकत घेतल्यानंतर प्रचिती खराब आली की मग पुन्हा त्याऐवजी दुसरा पर्याय शोधावा लागतो. पावसाळ्यात हॅण्डल कव्हरामुळे एक्सरेटर, क्लच, हॅण्डब्रेक यांच्या खाचेमध्ये पाणी जाण्यापासून रोखले जाईल हे खरे असले तरी हेडलॅम्पच्या काचेवर मात्र याचे प्लॅस्टिक ज्या पद्धतीने लावले जाते व त्या प्लॅस्टिकचा दर्जा व स्तर पाहाता त्यामुळे तुमच्या हेडलॅम्पच्या काचेवर हळू हळू चरे पडू लागतात. विशेष करून दुचाकी चालवताना येणाऱ्या वाऱ्यामध्ये हे कव्हर पुढील बाजूने हेडलॅम्पच्या काचेवर घासले जाते. त्यामुळे काचेवर चरे पडण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे धूळ, चिखल यांचाही मारा होत असतो व तो पुसला तरी प्लॅस्टिकवरून काही नीट जात नाही. गेलाच तर आतील बाजूने काचेवर पडलेले चरे हे हेडलॅम्पच्या प्रकाशाला सुस्पष्ट व प्रखर पडण्यामध्ये अडथळे ठरत असतात. यामळु शक्यतो हेटलॅम्प कव्हर होणारे ते प्लॅस्टिक तरी काढून टाकावे किंवा त्याचा दर्जा चांगला आहे की नाही हे पाहून घ्यावा. त्यापेक्षा दुसरा चांगला उपाय म्हणजे त्यावर स्टीकर प्रकारात मिळणारे पारदर्शक पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टिक पाहावे. अर्थात हा प्रकार फार कमी ठिकाणी मिळतो. कार लॅमिनेट केल्या जातात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्लॅस्टिक उपलब्ध असते. तशा प्रकारचा स्टिकर लावल्याने तुमच्या हेडलॅम्पच्या काचेचेही संरक्षण होते व काचेवर प्लॅस्टिक घासून चरे पडण्याचा धोकाही नसतो.