शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

इंजिनाच्या आत स्पार्क देत इंजिन चालवणारा स्पार्क प्लग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:59 IST

इंजिनाच्या आंतरिक दहनाला प्रज्वलित करणारा स्पार्क प्लग हा अतिशय महत्त्वाचा घटक असून स्पार्क प्लगविना इंजिन व्यर्थच आहे.

ठळक मुद्दे१८६० मध्ये एटीएन लेनोइर याने अशा स्पार्क प्लगचा पहिल्यांदा प्रयोग केला१९०२ मध्ये रॉबर्ट बॉश यांनी केलेल्या संशोधनामुळे व्यावसायिक स्वरूपातील व्यवहार्य अशा उच्च व्होल्टेज स्पार्क प्लगचा अविष्कार केलाअंतर्गत दहन करणाऱ्या इंजिनाच्या विकासाला तेव्हा खऱ्या अर्थाने चालना मिळाली

इंजिनाच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे स्पार्क प्लग. पेट्रोल,डिझेल, सीएनजी वा एलपीजी या इंधनावरील वाहनांसाठी इंजिन हे लागतेच व इंजिनात कॉम्प्रेसड् अशा इंधन व हवेला प्रज्वलीत करण्याचे काम करतो तो स्पार्क प्लग. त्याशिवाय इंजिन चालू शकमार नाही. स्कूटर पासून अगदी ट्रक, बस यासारख्या अवजड वाहनापर्यंत या स्पार्क प्लगचे काम अतिशय महत्त्वाचे असते. इंजिनाच्या आत काय आहे हेच जणू हा स्पार्क प्लग डोकावून बघत असतो. त्याची रचना वा त्याचे कार्य हेच मुळात त्या ठिकाणचे असते. इथएनॉल वा द्रवीभूत पेट्रोलला ठिणगी टाकून प्रज्वलीत केल्यानंतर इंजिनाच्या सिलेंडर हेडवर लावलेला स्पार्क प्लग सतत आपले ठिणगी चेतवण्याचे काम चालू ठेवतो.स्पार्क प्लगमथ्ये विद्युतरोधित केंद्रीय इलेक्ट्रोड असतो. त्याच्या बाहेरच्या बाजूला विद्युत रोधित तारेद्वारा तो जोडलेला अलतो. त्यातून तो इंजिनाच्या आंतिरक दहन क्रियेत महत्त्वाचे काम करीत असतो. सिलेंडरच्या आत तो ठिणगी उत्पन्न करतो.

१८६० मध्ये एटीएन लेनोइर याने अशा स्पार्क प्लगचा पहिल्यांदा प्रयोग केला होता. प्राथिमक स्तरावर पिहले पेटंट निकोला टेस्ला याच्याकडून १८९८ मध्ये तर फ्रेडरपिक रिचर्ड्स सिम्स व रॉबर्ट बॉश यांना मिळाले. मात्र १९०२ मध्ये रॉबर्ट बॉश यांनी केलेल्या संशोधनामुळे व्यावसायिक स्वरूपातील व्यवहार्य अशा उच्च व्होल्टेज स्पार्क प्लगचा अविष्कार केला. अंतर्गत दहन करणाऱ्या इंजिनाच्या विकासाला तेव्हा खऱ्या अर्थाने चालना मिळाली. वाहनातील इंजिनाप्रमाणेच अन्य ठिकाणीही स्पार्क प्लगचा वापर केला जातो. स्पार्क प्लग एक उभट आकाराचा धातूमध्ये तयार केलेली एक वस्तू आहे. त्याच्या एका बाजूला जो भाग इंजिनात असतो तेथे स्पार्क पडला जातो तो इलेक्ट्रॉड असतो.

पोर्सेलिनसारख्या घटकाने हा प्लग वेढलेला असतो. प्रचंड ऊर्चा इंजिनात तयार होताना तो अतिशय उष्ण अशा तापमानात असतो. बाहेरच्या बाजूला तो एका वायरीला संलग्न केलेला असतो, तेथून त्याला करंट मिळतो. प्लग नसेल तर इंजिन व्यर्थ आहे हे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे त्या प्लगचा इलेक्ट्रॉड विशिष्ट काळानंतर खराब होणे व तो वेळेवर बदलला जाणे हे कारच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. त्याचा इलेक्ट्रॉड हा बाहेर काढून त्यातील गॅप नीट ठेवून तो साफही करून त्यात योग्य अंतर ठेवून तो वापरला जातो. यातील ही गॅप हा ही अतिशय महत्त्वाचा भाग असून ती जर योग्य नसेल तर इंजिन खऱाब पद्धतीने चालेल व कदाचित चालणारही नाही. मात्र ठरावीक वापरानंतर तो बदलणे हे ही अतिशय महत्त्वाचे आहे. कारण स्पार्कविना इंजिनाचे आंतरिक दहन अशक्य आहे व त्याशिवाय इंजिन चालणेही शक्य नाही.

टॅग्स :Automobileवाहनcarकार