son pulls scratches for father have to buy new BMWs; But Showroom manager sent him in jail | वडिलांनी नवी कोरी बीएमडब्ल्यू विकत घ्यावी म्हणून स्क्रॅच ओढले; पण शोरुमवाल्याने तुरुंगात धाडले

वडिलांनी नवी कोरी बीएमडब्ल्यू विकत घ्यावी म्हणून स्क्रॅच ओढले; पण शोरुमवाल्याने तुरुंगात धाडले

बिजींग : चीनमध्ये जियांग्शी येथील एका बीएमडब्ल्यू शोरुममध्ये एक अजब प्रकार घडला आहे. एका 22 वर्षांच्या तरुणाने नव्या कोऱ्या आलिशान कारला मोठे मोठे स्क्रॅच मारले. कारणही असे होते की त्याने स्क्रॅच मारल्याने वडिलांना ही कार घेणे भाग पडेल. वडिलांनी कार खरेदी केली नाहीच पण शोरुम मॅनेजरने या तरुणालाच तुरुंगाची हवा खायला धाडले आहे. 


पोलिसांनी सांगितले की तरुणाचे नाव माउबिंग आहे. जर त्याने ड्रायव्हिंग टेस्ट पास केली तर त्याला लक्झरी कार घेऊन देण्याचे वचन त्याच्या वडिलांनी दिले होते. मात्र, त्याने ड्रायव्हिंग टेस्ट पास करून वर्ष लोटले तरीही त्याला वडिलांनी कार घेऊन दिली नव्हती. यानंतर या तरुणाने हे पाऊल उचलले. 


या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. शोरुमच्या मॅनेजरने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. चौकशीवेळी माऊबिंगने सांगितले की, त्याला लक्झरी कार खूप आवडते. त्याने खरेदी करण्यासाठी काही पैसेही जमविले आहेत. 

Web Title: son pulls scratches for father have to buy new BMWs; But Showroom manager sent him in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.