शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

फक्त 50 हजारात बुक करा 9 एअरबॅग्स असलेली SUV! फीचर्स असे, की Fortuner सुद्धा विसरून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 14:26 IST

बुकिंगसोबतच, कंपनीने आपल्या स्कोडा कोडियाक प्रिमियम एसयूव्हीच्या नव्या किमतीही जाहीर केल्या आहेत.

जर आपण भारतात फुल साइज SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्याकडे फारसे पर्याय नाहीत. फोर्ड गेल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनरच्या विक्रीत वाढ झाली आहे. यातच आता स्कोडाने जानेवारी महिन्यात आपली कोडियाक (Kodiaq) लॉन्च केली आहे. लॉन्चिंगनंतर या एसयूव्हीचे सर्व युनिट्स विकले गेले होते. आता कंपनीने पुन्हा एकदा एस एसयूव्हीची बुकिंग सुरू केली आहे. यानुसार आता ग्राहकांना ही एसयूव्ही केवळ 50 हजार रुपयांतच बूक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला कंपनीच्या डीलरशिपकडे संपर्क साधावा लागेल. 

बुकिंगसोबतच, कंपनीने आपल्या स्कोडा कोडियाक प्रिमियम एसयूव्हीच्या नव्या किमतीही जाहीर केल्या आहेत. या एसयूव्हीच्या बेस व्हेरिअंट स्टाईलची किंमत आता 37.49 लाख रुपये झाली आहे. तर L&K या टॉप व्हेरिअंटची किंमत 39.99 लाख रुपये एवढी असेल. या नव्या किमतीनुसार, आता  कोडियाक 1.5 लाख रुपयांनी महागली आहे. नव्या बुकिंगची डिलिव्हरी जानेवारी 2013 पर्यंत केले जाईल.

9 एअबॅग्ससह खास फीचर्स - इंजिनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या गाडीला 2.0 -लिटरचे टीएसआय टर्बो-पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 188 बीएचपी आणि 320 एनएम जेनरेट करते. हे इंजिन 7- स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडलेले आहे. यात ऑल-व्हील ड्राइव्हही मिळते. या एसयूव्हीमध्ये स्टँडर्ड सेफ्टी फीचर्समध्ये 9 एअरबॅग्स, ESC, अँटी-स्लिप रेग्युलेशन, रिअर-व्ह्यु कॅमेरा, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेंसरचाही समावेश आहे.

दमदार फीचर्स -या कारमध्ये LED हेडलॅम्प्स, ऑटोहेडलॅम्प्स आणि वायपर्स, ऑटो डिमिंग मिरर, panoramic sunroof, 18 इंचांचे अलॉय व्हील, लेदर अपहॉल्स्ट्री, ambient lighting, हँड्स फ्री पार्किंग, 8 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम आणि 3 झोन क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनSkodaस्कोडाcarकार