Skoda in India: स्कोडाचा भारतात खप किती?; आकडा बघून आश्चर्याचा धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 09:10 AM2023-03-18T09:10:05+5:302023-03-18T09:10:40+5:30

 स्कोडाने गेल्या वर्षी त्यांच्या लाईनअपमध्ये मोठा बदल केला होता. नवनवीन मॉडेल बाजारात उतरविली होती.

Skoda in India: What is the consumption of Skoda in India? surprising statistics | Skoda in India: स्कोडाचा भारतात खप किती?; आकडा बघून आश्चर्याचा धक्का बसेल

Skoda in India: स्कोडाचा भारतात खप किती?; आकडा बघून आश्चर्याचा धक्का बसेल

googlenewsNext

गेल्या काही वर्षांत भारतातून दोन अमेरिकी ऑटोमोबाईल कंपन्यांनी पलायन केले आहे. अशातच आणखी काही कंपन्या या वाटेवर असल्याचे अधूनमधून म्हटले जात असते. 'स्कोडा'बाबत बाजारात अशा काही चर्चा आहेत, पण या शंकेला सुरुंग लावणारी आकडेवारी समोर आली आहे. स्कोडासाठी भारतीय बाजारपेठ ही तिच्या जगातील बाजारपेठांपैकी तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. हो हे खरे आहे. स्कोडा ही प्रमिअम कार बनविणारी कंपनी आहे. यामुळे या कंपनीकडे ग्राहकवर्ग कमी असला तरी या कंपनीने गेल्या वर्षी भारतात 51,865 कार विकल्या आहेत. ही वाढ 128% ची आहे.

 स्कोडाने गेल्या वर्षी त्यांच्या लाईनअपमध्ये मोठा बदल केला होता. नवनवीन मॉडेल बाजारात उतरविली होती. जुनी मॉडेल काढून टाकली होती. याचा फायदा कंपनीला झाला आहे. स्कोडा ही झेक रिपब्लिकची कंपनी. परंतु, तिथे ही कंपनी दुसऱ्या नंबरवर आहे. तिथे 71,200 कार विकल्या गेल्या आहेत. 

युरोपबाहेर स्कोडाची सर्वात मोठी बाजारपेठ भारत बनला आहे. स्कोडा जर्मनीमध्ये 1,34,300 कार विकते. यूके आणि पोलंड अनुक्रमे 50,000 आणि 45,000 युनिट्ससह चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. कुशाक आणि स्लाव्हियाने स्कोडाला तारले आहे. 
 

Web Title: Skoda in India: What is the consumption of Skoda in India? surprising statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Skodaस्कोडा