केंद्र सरकारने बहुतांश वस्तूंवरील जीएसटी कमी केला आहे. यामुळे वाहन बाजारात मोठी उसळी येण्याची शक्यता आहे. कार, दुचाकींच्या किंमती देखील कमी होणार आहेत. कारवरील जीएसटी कमी आणि सेस रद्द केल्याने मोठा फायदा होणार आहे. अशातच मारुती, टाटा, ह्युंदाई, महिंद्रा या कंपन्यांच्या कारच्या संभाव्य किंमती समोर आल्या आहेत.
मारुतीची एसयुव्ही ब्रिझाला ४० टक्के कर बसणार आहे. यामुळे या कारच्या किंमतीत ५ टक्क्यांची म्हणजेच ३० ते ४८ हजार रुपयांपर्यंतची कपात होणार आहे. आधी ४५ टक्के कर यावर होता. टाटा नेक्सॉनच्या पेट्रोल व्हेरिअंटवर 68 हजार ते 1.26 लाख रुपयांचा जीएसटी कमी होणार आहे. तर डिझेल व्हेरिअंटवर 99 हजार ते 1.55 लाख रुपयांपर्यंतचा जीएसटी कमी होणार आहे. तसेच महिंद्राच्या XUV 3XO Petrol वर 68 हजार ते 1.35 लाख आणि डिझेल व्हेरिअंटवर 99 हजार ते 1.49 लाख एवढी मोठी कपात होणार आहे.
छोट्या कारचा विचार केला तर मारुतीच्या अल्टोवर 47 हजार ते 68 हजार रुपये जीएसटी कमी होणार आहे. संभाव्य किंमत 3.76 - 5.53 लाख रुपये एक्स शोरुम असणार आहे. टाटा टियागोवर 55 हजार ते 94 हजार रुपयांचा जीएसटी कमी होणार आहे. टियागो 4.45 - 7.61 लाख रुपये एक्स शोरुम मिळणार आहे. मारुतीची वॅगनआरवर 64 हजार ते 84 हजार एवढा जीएसटी कमी होणार आहे. यानुसार वॅगनआरची एक्स शोरुम किंमत 5.15 - 6.78 एवढी होणार आहे. मारुती स्विफ्टची किंमत 71 हजार ते 1.06 लाख रुपयांनी कमी होणार आहे. तर ह्युंदाई आय २० ची किंमत 83 हजार ते 1.24 लाख रुपयांनी कमी होणार आहे.
या जीएसटी कपातीचा फायदा सब कॉम्पॅक्ट एसयुव्हींना होणार आहे, ज्या कार लांबीला ४ मीटरपेक्षा कमी आहेत, त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर उतरणार आहेत. पेट्रोल १२०० सीसी आणि डिझेल १५०० सीसी इंजिन क्षमता ठेवण्यात आली आहे. यामुळे कार घेताना या दोन गोष्टींचा थोडा जरी विचार केला तरी तुमचे २ वर्षांचे इंधन तुम्हाला फुकटच मिळाल्यासारखे असणार आहे.