शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

दीड लाखांत ५०१ किमीची रेंज देणारी EV मोटरसायकल दाखवा; Ola Roadster सिरीज लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:10 IST

Ola Roadster Launched news: ओलाच्या एस१ प्रो जेन ३ स्कूटर गेल्याच आठवड्यात लाँच करण्यात आल्या आहेत. आज ओलाने रोडस्टर सिरीज लाँच केली आहे.

ओलाने मोठा धमाका केला आहे. ईलेक्ट्रीक स्कूटरचे जेन ३ मॉडेल्स लाँच केल्यानंतर आता मोटरसायकल बाजारातही    कमी किंमत आणि जास्त रेंज देत दोन्ही प्रकारात आपणच बादशाह असल्याचा दावा केला आहे. महत्वाची बाब म्हणजे ओलाची ही मोटरसायकल ७० हजार रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरुवात होते, ती दीड लाखांवर जाते. या दीड लाखांच्या बाईकची रेंज ओलाने ५०१ किमी असल्याचे सांगितले आहे. 

ओलाच्या एस१ प्रो जेन ३ स्कूटर गेल्याच आठवड्यात लाँच करण्यात आल्या आहेत. आज ओलाने रोडस्टर सिरीज लाँच केली आहे. वजन आणि खर्च कमी करण्यासाठी ओलाने वायरिंगचे वजन ४ किलोवरून केवळ ८०० ग्रॅमवर आणले आहे. यासाठी कॉम्प्युटरमध्ये वापरत असलेली फ्लॅट केबल बनविण्यात आली आहे.

ओला रोडस्टर एक्सची किंमत बॅटरी पॅकनुसार ७४ हजार रुपयांपासून सुरुवात होत आहे. तर Roadster X+ ची किंमत १,०४ लाखांपासून सुरु होते. यामध्ये ओलाने ४ किलोवॉट आणि ९ किलो वॉटचे बॅटरी पॅक दिले आहे. याची रेंज २५२ किमी आणि ५०१ किमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या ५०१ किमीच्या रेंजच्या बाईकची किंमत १.५४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 

या इंट्रॉडक्टरी किंमती असून ही ५०१ किमीची रेंज असलेली मोटरसायकल १.६९ रुपये किंमतीची आहे. सर्व बाईकच्या मूळ किंमतीत १५००० रुपयांची कपात करण्यात आली आहे. रोडस्टर एक्स ही २.५, ३.५ आणि ४.५ किलो वॉट बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध होणार आहे. 

भाविश अग्रवाल यांचे दावे काय...या रेंजवरून ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दीड लाखांत ५०१ किमीची रेंज देणारी मोटरसायकल शोधून दाखवा असे आव्हान दिले आहे. तसेच इतर कंपन्या जेन १ ला अद्याप मागे टाकू शकलेल्या नाहीत, आपण जेन ३ देत आहोत. १२५ सीसीच्या पेट्रोल बाईकच्या किंमतीत ईलेक्ट्रीक मोटरसायकल देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जेन १ मध्ये जे वायरिंग आणि कनेक्टर होते त्यामुळे या स्कूटरना समस्या येत होत्या, त्या आता दूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारत सेल देखील या मोटरसायकलमध्ये भविष्यात वापरला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर