शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

सीट कव्हर्स घेताना त्याच्या विविधतेबरोबरच करा उपयुक्ततेचाही विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 18:00 IST

कार नवी घेतली तरी सीट कव्हर आपल्या आवडीप्रमाणे निवडल्याविना आपल्याला शांतता लाभत नाही. मात्र ही सीट कव्हर्स निवडताना स्वतः पाहून व बघून खात्री करणे व हे अधिक उत्तम.

ठळक मुद्देनायलॉन वा सिंथेटिक वस्त्रप्रकारातही सीट कव्हर्स येतात मात्र ही कव्हर्स अजिबात घेऊ नयेतत्या प्रकारच्या कव्हरस्मुळे अॅलर्जी उठण्याचा, घाम जास्त येण्याचाही संबंध असतो.कोणत्या प्रकारची कव्हर्स घ्यायची ते खरे म्हणजे प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊनच नक्की करावे

सर्वसाधारणपणे कार नवी न घेतली तरी आतील सीटवर आपल्याला आवडणारे, कारच्या रंगसंगतीशी जुळणारे सीट कव्हर असावे, असे अनेकांना वाटते. ते चूक नाही. किंबहुना कारमध्ये कंपनीने दिलेल्या आसन व्यवस्थेमध्ये कंपनीच्या वितरकाकडूनच तुम्हाला सीट कव्हर हवे आहे का, अशी विचारणा केली जाते. विविध प्रकारची ही सीट कव्हर्स बाजारात उपलब्ध असून तुम्ही कोणते सीट कव्हर घेणार आहात ते खरे म्हणजे तुम्ही स्वतः ते कव्हर पाहू ठरवावे. कॉटन कापड, नायलॉन, ताग, फोम लेदर, लेदर अशा विविध प्रकारच्या पद्धतींमध्ये ही सीट कव्हर्स बाजारात मिळतात. तुमच्या कारच्या मॉडेलनुसार ती तयार असतात, तर कधी ती तयार करून घ्यावी लागतात.

या सर्व कामासाठी किमान मुंबईसारख्या शहरात दोन दिवस तरी जातातच. मात्र ही कव्हर्स घेताना तुम्ही केवळ छान दिसतात म्हणून त्याच्या रंगावर भुलून जाऊ नका, त्याच्यामध्ये वापरलेल्या मटेरिअलचाही विचार करा. कारण एकदा का सिट कव्हर टाकले की ते मग जरी पसंत पडले नाही, तर मग मात्र तुमचे पैसे फुकट गेल्याचे दुःख होते. तुम्हाला नव्याने पैसे खर्च करून नवे सीट कव्हर तयार करून घ्यावे लागते.

सीट कव्हर्सच्या अनेक प्रकारच्या मटेरिअलचा विचार करता साधारणपणे कॉटन, वेलवेट या मटेरिअलपासून तयार केलेली सीट कव्हर्स काहीशी स्वस्त, धुता येण्यासाऱखी असतात. ही दोऱ्यांद्वारे तुमच्या कारमधील आसनाला बांधली जातात. ड्रायव्हरच्या रांगेतील सीट कव्हर्सना मागच्या बाजूने कागदपत्र वा काही वस्तू ठेवतचा येतील यासाठी चेन लावलेला एक कप्पाही दिला जातो. रेक्झिन वा फोम लेदर, मायक्रो लेदर या नावाखाली येणारी दिली जाणारी कव्हर्स तुम्हाला रंगांमध्येही उपलब्ध असतात. मात्र उन्हामध्ये ही कव्हर्स गरम होतात हे लक्षात घ्या. अन्यथा ती कव्हर्स स्वच्छ करण्यासाठी सोपी आहेत, टिकावूही आहेत. नायलॉन वा सिंथेटिक वस्त्रप्रकारातही सीट कव्हर्स येतात मात्र ही कव्हर्स अजिबात घेऊ नयेत उष्ण कटिबंधात आपण राहातो, हे लक्षात घ्या तसेच त्या प्रकारच्या कव्हरस्मुळे अॅलर्जी उठण्याचा, घाम जास्त येण्याचाही संबंध असतो.

कॉटन, वेलवेट, ताग हे साधारण सुसह्य असणारे मटेरिअल आहे, मात्र पावसामध्ये ते ओले झाल्याने त्रासदायक असते.तागावर मात्र पाणी सांडले तर ते झटकन झटकता येते. वेलवेट वा कॉटनच्या कव्हराला तसे करता येत नाही. तागामध्ये खूप चांगल्या रचनेमध्ये, आरेखनामध्ये ही कव्हर्स मिळतात. फोम लेदरचा प्रकारही वापरायला तसा सोयीस्कर आहे. अर्थात तुम्ही कोणत्या प्रकारची कव्हर्स घ्यायची ते खरे म्हणजे प्रत्यक्ष दुकानामध्ये जाऊनच पाहून, नक्की करावे हे केव्हाही उत्तम.

टॅग्स :carकारAutomobileवाहन