कार उचलण्यासाठी काहीसा श्रमकरी असा मॅन्युएल जॅक जास्त टिकावू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 04:04 PM2017-10-19T16:04:26+5:302017-10-19T16:05:57+5:30

कार उचलण्यासाठी तयार केलेला सीझर्स जॅक हे सुटसुटीत असे अवजार आहे त्यामुळे सुरक्षितपणे तुम्ही एका नटबोल्ट तंत्रासारख्या पद्धतीने अगदी हजार किलोपेक्षा जास्त वजनाची कार उचलू शकता. तो प्रत्येक कारमध्ये असायलचा हवा.

scissor jak quiet labours | कार उचलण्यासाठी काहीसा श्रमकरी असा मॅन्युएल जॅक जास्त टिकावू

कार उचलण्यासाठी काहीसा श्रमकरी असा मॅन्युएल जॅक जास्त टिकावू

Next
ठळक मुद्देकार पंक्चर झाली की सर्वात महत्त्वाची कामगिरी असते ती म्हणजे पंक्चर झालेला टायर काढून त्याऐवजी स्टेपनी टायर बसवायचा. तुम्हाला एक मोठी कार उचलायची असते, ही कामगिरी म्हणजे तशी मोठीच सुमारे ९५० किलोपेक्षा जास्त वजन असलेले तुमच्या कारचे धूड सहजपणे उचलण्यासाठी किती ताकद लावावी लागेल, असा विचारही मनात आला तरी तो खरोखरच धाडसाचा.

कार पंक्चर झाली की सर्वात महत्त्वाची कामगिरी असते ती म्हणजे पंक्चर झालेला टायर काढून त्याऐवजी स्टेपनी टायर बसवायचा. त्यासाठी तुम्हाला एक मोठी कार उचलायची असते, ही कामगिरी म्हणजे तशी मोठीच सुमारे ९५० किलोपेक्षा जास्त वजन असलेले तुमच्या कारचे धूड सहजपणे उचलण्यासाठी किती ताकद लावावी लागेल, असा विचारही मनात आला तरी तो खरोखरच धाडसाचा. पण माणसाने अशा अनेक गोष्टींवर आपल्या बुद्धीचा वापर करून मात केली आहे. कार उचलण्यासाठी मॅन्युएल जॅकचा शोध लावला त्यासाठी स्क्रू व नटबोल्ट पद्धतीचा झालेला वापर हा सर्वात सुरुवातीचा व आजही तो अजून आहे. त्यातून उभ्या आकाराचा नटबोल्ट प्रकारच्या स्क्रू जॅक वेगळा पण त्याही पेक्षा काहीसा सुरक्षित असणारा सीझर्स जॅक हा अधिक सोयीस्कर, स्वस्त व तसा फार न त्रास देणारा आहे.

क्रॉस आकाराचा दिसणारा हा जॅक एका आडव्या स्क्रूसारख्या आटे असणाऱ्या जाड स्क्रूसारख्या कांबीवर आधारित असतो. कारच्या विशिष्ट भागाखाली या जॅकची वरची बाजू लावण्यापूर्वी जमीन कडक आहे की नाही, ते पाहून घेणे गरजेचे असते. त्यानंतर जॅक त्या जमिनीवर ठेवून त्या स्क्रूसारख्या दांडीला घड्याळासारखे फिरवावे लागते, त्यासाठी वेगळी एल आकाराची कांबी दिलेली असते. जॅकच्या छीद्रामध्ये ती अडकवून फिरवणे व स्क्रूड्रायव्हरसारखे हत्यार त्यात घालून फिरवणे . त्यामुळे आडवा स्क्रूसारखा मोठाभाग दोन फुलीसारख्या लोखंडी बाजूंना उंच करत जातो, त्यामुळे कर वर उचलली जाते. ती उतरवताना उलट्या पद्धतीने तो स्क्रू फिरवावा लागतो.

तब्बल हजार किलोचे वजन उचलण्याची क्षमता असणारे हे साधेसुधे अवजार म्हणजे मानवी बुद्धीचीच कमाल आहे. प्रत्येक कारमध्ये डिक्कीमध्ये ते आहे की नाही, ते प्रत्येकाने नेहमी तपासले पाहिजे. कोणथ्या कठीण प्रसंगी ते उपयोगाला येईल ते सांगता येणार नाही. यासाठी जॅक फॉर ऑल हे सूत्र नक्षात ठेवा.
 

Web Title: scissor jak quiet labours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.