शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

गटारांवरील लोखंडी झाकणांवरून स्कूटर चालवा सावधपणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 21:18 IST

रस्त्यावर असलेल्या पावसाळी वा ड्रेनेजच्या गटारांवर असलेली लोखंडी झाकणे ही दुचाकीला विशेष करून स्कूटर्सना धोकादायक ठरू शकतात. पावसाळ्यामध्ये त्यावरून जाताना अधिक दक्षतेने जाणे गरजेचे आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरून दुचाकी विशेष करून स्कूटर चालवताना अतिशय जपून चालवणे गरजेचे आहे. खास करून रस्त्यांवरील पेव्हर ब्लॉक्स जसे धोकादायक असतात, त्याचप्रमाणे रस्त्यावरील पावसाळी गटारांवरीची लोखंडी झाकणे (manhole covers) ही देखील अतिशय धोकादायक ठरू शकतात. केवळ पावसातच नव्हे तर पावसाळ्या व्यतिरिक्तच्या दिवसातही ही लोखंडी झाकणे दुचाकीसाठी व खास करून स्कूटरसाठी अपघात करणारी ठरू शकतात.पावसाळ्यामध्ये या झाकणांवर पाणी पडलेले असते, कधी त्याच्यावर अन्य घाणही झालेली असते, त्यामुळे ती अधिक बुळबुळीत झालेली असतात. त्या झाकणांच्या कडांवरून स्कूटरचे चाक ज्यावेळी जाते तेव्हा त्या टायरची रस्त्यावर असणारी पकड झाकणांवर व त्या झाकणांच्या कडावरून निसटते. स्कूटरची चाके व टायर्स हे मुळात मोटारसायकलपेक्षा आकाराने व रूंदीनेही लहान असतात. त्यामुळे रस्त्यावर त्यांची पकड ही मुळात मोटारसायकलच्या तुलनेत तशी कमी असते. त्याचप्रमाणे वजनालाही त्या तुलनेत हलक्या असल्याने आजकालच्या ऑटो गीयरच्या स्कूटरची एकूणच रस्त्यावर असणारी पकडही तशी फार मजबूत असत नाही. हे लक्षात घेता रस्त्यावरच्या या गटांरांवरील चौकोनी, गोल लोखंडी झाकणांवरून स्कूटर नेताना त्या झाकणांचा पावसामध्ये ओली झाल्याने असलेला बुळबुळीतपणा, त्यांच्या कडांना असलेला निसरडा आकार यामुळे स्कूटरचा समतोल अनेकदा बिघडत असतो. परिणामी स्कूटरची टायरद्वारे रस्त्यावर असणारी पकड ही चांगलीच ढिली पडते. रस्त्यावर या झाकणांभोवती असलेली सिमेंटची चौकट किंवा पेव्हर ब्लॉकद्वारे त्याला सर्व बाजूने केलेले फ्लोअरिंग हे देखील खराब झालेले असते.पावसाळ्यामध्ये त्या चौकटीलाही खड्डे गेलेले असल्याने स्कूटरसाठी हा भाग अतिशय अपघातग्रस्त अशाच स्वरूपाचा असतो. गटाारांच्या या झाकणांसाठी लोखंडाचा वापर प्रामुख्याने केलेला असतो. किमान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी तरी ही लोखंडी झाकणे,जाण्या, पूर्ण बंद असणारी असतात. नवीन असताना त्या झाकणांना खाचे वा उंचवटे असतात, त्यामुळे त्यांचा निसरडेपणा कमी झालेला असतो. पण कालांतराने त्यावरून सतत वाहने जाऊन त्याचा नवीन असताना असणारा पृष्ठभाग जसा खडपडीत असतो, तो जाऊन त्या झाकणाच्या या पृष्ठभागाला गुळगुळीतपणा येतो व पावसामध्ये तो बुळबुळीत होतो.यामुळे स्कूटरचा टायर नवा असूंद्या किंवा काहीसा वापरलेला या झाकणांवर स्कूटर घसरण्याची शक्यता असते. काहीवेळा ही झाकणे ज्या पद्धतीने बसवलेली असतात, त्याचा पाया ढासळतो, त्यांची स्तर बिघडतो, ती हलत असतात. कधी कधी ती उघडीही असता. यामुळेही अशा प्रकारच्या झाकणांवरून स्कूटर नेताना ती स्थिती अपघातजन्य अशी असते. तेव्हा रस्त्यावरून स्कूटर वा दुचाकी नेताना अशा प्रकारच्या लोखंडी झाकणांवरून जाताना अतिशय सावधपणे व योग्य गतीने स्कूटर न्या. काहीवेळा यामध्ये होणारा अपघात हा फार मोठा नसतो, पण स्कूटर कलंडण्याची शक्यता, पायांवर वा हातावर त्यामुळे अतिरिक्त जोर येण्याची शक्यता यामुळे छोट्या छोट्या शारीरीक त्रासालाही तोंड देम्याची वेळ येते. तेव्हा गटारावरील या झाकणांपासून सावधान.