शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारबाबतचे काही तथ्य काही अफवा; सकाळी इंधन भरणे चांगले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 16:16 IST

कार किंवा मोटरसायकल घेतल्यानंतर मायलेज किती देते? असे प्रश्न विचारले जातात. अमक्याची कार एवढे देते, मग तुझी कमी कशी देते, असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात.

कार किंवा मोटरसायकल घेतल्यानंतर मायलेज किती देते? असे प्रश्न विचारले जातात. अमक्याची कार एवढे देते, मग तुझी कमी कशी देते, असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. तसेच एसी वापरू नको, इंधन अवेळी भरू नको अशाप्रकारचे सल्लेही दिले जातात. या सल्ल्यांमागे काही अनुभव काही अफवाही असतात. चला पाहुया यापैकी काही तथ्य.

एसी लावल्याने कारचे मायलेज कमी होते...एसी लावल्याने कार कमी मायलेज देते, असे सांगितले जाते. काही अंशी खरेही आहे. जर कमी वेग असेल आणि एसी चालू असेल तर कार कमी मायलेज देते. पण जर हायवेवर वेगात असाल आणि एसी बंद ठेवल्यास काचा अघडाव्या लागतात. यामुळे समोरून वेगात येणारी हवा आत शिरत उलट कारला विरोध करते. यामुळे वेगात असताना काचा बंद करून एसी लावल्यास उलट मालयेज वाढते. 

मॅन्युअल पेक्षा अॅटोमॅटीक जास्त इंधन जाळतेमॅन्युअल ट्रान्समिशनपेक्षा अॅटोमॅटीक कार जास्त इंधन जाळते, असे सांगितले जाते. काही अंशी खरेही आहे. अॅटोमॅटीक ट्रान्समिशनची कार सारखी गिअर बदलत असल्याने इंधन जास्त जाळते. तर मॅन्युअल ट्रान्समिशनची कार आपल्याला हवे तेव्हा गिअर बदलता येतात. यामुळे मायलेज चांगले देते. एका प्रसिद्ध कंपनीची पाच लाखांची कार मॅन्युअल पेट्रोलला 22 किमी पर्यंत मायलेज देते. तर तिच अॅटोमॅटीक कार 14 किमीचे मायलेज देते. मात्र, ट्रॅफिकच्या ठिकाणी अॅटोमॅटीक कारच फायद्याची ठरते. 

सकाळी किंवा रात्री उशिरा इंधन भरणे चांगले?सकाळी किंवा रात्री उशिरा थंड हवामान असते. अशावेळी पेट्रोल, डिझेल थंड असते. मात्र, उष्णतेच्या दुपारच्या वेळात हेच इंधन काही प्रमाणात प्रसरण पावलेले असते. आकुंचन प्रसरण पावण्याच्या या प्रकाराला डेन्सिटीमध्ये (घनता) मोजतात. पेट्रोल पंपावर केबीनजवळ जाऊन पाहिल्यास तिथे एक बोर्ड लावलेला असतो. त्यावर ती नमूद केलेली असते.  इंधनाच्या टाक्या या जमिनीमध्ये असतात. यामुळे संध्याकाळनंतरही जमिन तापलेली असल्याने टाकीतील इंधन गरम असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपावर इंधन घेऊन येणाऱ्या टँकरमध्येही घनता जुळत नाही. यामुळे पेट्रोल डेपोमध्ये जी घनता नोंदवलेली असते ती जुळे पर्यंत टँकर उभे करून ठेवतात. ही घनता पेट्रोल डेपोमधील तापमानावर अवलंबून असते. 

प्रिमिअम पेट्रोल जास्त ताकद देते?पेट्रोल कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी दोन तीन रुपये जादा दर असलेले प्रिमिअम पेट्रोल आणले आहे. मात्र, ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. सुरुवातीला नवीन प्रकार म्हणून वाहनचालकांनी हे पेट्रोल वापरले. मात्र, नंतर याचा काहीच फायदा दिसून येत नसल्याने पुन्हा साध्याच पेट्रोलकडे आपला मोर्चा वळवला. प्रिमिअम पेट्रोल साध्या पेट्रोलपेक्षा जास्त रिफाईन्ड नसते. मात्र, जास्त ज्वलनशील असते. यामुळे ज्या गाड्यांचे इंजिन उच्च कॉम्प्रेसन रेशोचे असते त्यांना ते फायद्याचे ठरते. अशा गाड्या या लक्झरी कार असतात. यामुळे साध्या कारमध्ये साधे पेट्रोल वापरल्यास काही समस्या येत नाही. 

टॅग्स :carकारAutomobileवाहन