शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Royal Enfield च्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 3 बाइक्स; दुसऱ्या क्रमांकाची फक्त 1.5 लाख रुपयांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 01:28 IST

जाणून घेऊयात, सप्टेंबर 2022 मध्ये रॉयल एनफिल्डच्या सर्वाधिक विक्री झालेल्या तीन बाइक्ससंदर्भात...

रॉयल एनफिल्डबाईक्सना भारतात जबरदस्त मागणी आहे. महत्वाचे म्हणजे, 350 सीसी सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल्स याच कंपनीचे आहेत. Honda पासून ते Jawa आणि Yezdi पर्यंत अनेक कंपन्या Royal Enfield ला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. Royal Enfield ने काही महिन्यांपूर्वी आपली Hunter 350 बाइक लॉन्च केली. या बाइकला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. तर जाणून घेऊयात, सप्टेंबर 2022 मध्ये रॉयल एनफिल्डच्या सर्वाधिक विक्री झालेल्या तीन बाइक्सबद्दल.

1. Royal Enfield Classic 350 -रॉयल एनफील्ड क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) ही अनेक वर्षांपासून कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक आहे. कंपनीने गेल्या वर्षीच ही बाईक अपडेट केली आहे. यात कंपनीने तिला जे-सिरीज इंजिन दिले आहे. हे इंजिन अधिक स्मूथ आणि फ्यूअल इफिशिअन्ट आहे. सप्टेंबर 2022 मध्ये या बाईकच्या 27,571 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 101 टक्क्यांनी अधिक आहे.

2. Royal Enfield Hunter 350 -कंपनीचे दुसरे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल म्हणजे, रॉयल एनफिल्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350). हे मॉडे काही महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आले होते. ही बाइक कंपनीच्या सर्वात स्वस्त बाइक्सपैकी एक आहे. हिची किंमत 1.49 लाख रुपयांपासून सुरू होते. सप्टेंबर 2022 मध्ये, रॉयल एनफिल्डने हंटरच्या 17,118 युनिट्सची विक्री केली. ही बाजारात नवीन मोटरसायकलसाठी चांगली सुरुवात आहे.

3. Royal Enfield Meteor 350Royal Enfield चे सेप्टेंबर 2022 मध्ये तिसरे सर्वाधिक विकले गेलेले मॉडेल म्हणजे Meteor 350. ही कंपनीची एक क्रूझर बाइक आहे. जीच्यावर दूरचा प्रवासही आराम दायक होऊ शकतो. सप्टेंबर 2022 मध्ये, रॉयल एनफील्डने याबाइकच्या 10,840 यूनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात या बाइकच्या फक्त 6,184 यूनिट्सचीच विक्री झाली होती.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकAutomobileवाहन