शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Royal Enfield Super Meteor 650 : फक्त 2 हजारांत 'ही' क्रूझर बाईक बुक करू शकता; जाणून घ्या इंजिन, ब्रेकिंग सिस्टमची संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:54 IST

Royal Enfield Super Meteor 650 ही एक प्रिमियम क्रूझर बाईक आहे. या बाईकची अपेक्षित किंमत, इंजिन, ब्रेकिंग सिस्टीम आणि स्पेसिफिकेशन्स याबद्दल जाणून घ्या....

रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपली नवीन क्रूझर बाईक Royal Enfield Super Meteor 650 आणली आहे . या बाईकचे जागतिक पदार्पण कंपनीने EICMA 2022 ऑटो शोमध्ये केले आहे. Royal Enfield Super Meteor 650 ही एक प्रिमियम क्रूझर बाईक आहे. या बाईकची अपेक्षित किंमत, इंजिन, ब्रेकिंग सिस्टीम आणि स्पेसिफिकेशन्स याबद्दल जाणून घ्या....

रॉयल एनफिल्डने Super Meteor 650 दोन व्हेरिएंटसह बाजारात लाँच केली आहे. पहिला व्हेरिएंट म्हणजे Super Meteor 650 आणि दुसरा व्हेरिएंट म्हणजे Super Meteor 650 Tourer आहे. रॉयल एनफिल्डने अद्याप या बाईकच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही बाईक 3.90 लाख ते 4.30 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह येऊ शकते.

Royal Enfield Meteor खरेदी करण्यासाठी कंपनीने आपली बुकिंग विंडो उघडली आहे. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आणि त्यांच्या जवळच्या डीलरशिपला भेट देऊन ते बुक करू शकतात. या बाईकच्या बुकिंगसाठी कंपनीने 2,000 रुपये टोकन रक्कम निश्चित केली आहे. Royal Enfield Super Meteor 650 मध्ये 648 cc इंजिन आहे. हे इंजिन 47 PS कमाल पॉवर आणि 52 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन स्लिपर क्लच असिस्टसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Royal Enfield Super Meteor 650 Braking and Suspension Systemबाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, यात समोर 320 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 300 mm डिस्क ब्रेक आहे, ज्यामध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर समोर 43 mm अप साइड डाउन फोर्क सस्पेन्शन बसविण्यात आले आहे आणि मागील बाजूस ट्विन गॅस चार्ज शॉक ऍब्जॉर्बर सस्पेन्शन सिस्टीम बसविण्यात आली आहे.

Royal Enfield Super Meteor 650 Colorकंपनीने या बाईकचे दोन्ही व्हेरिएंट वेगवेगळ्या कलर ऑप्शनसह बाजारात आणली आहे. Super Meteor 650 खरेदी करण्यासाठी पाच कलर ऑप्शन उपलब्ध आहेत, जे Astral Black, Astral Blue, Astral Green, Interstellar Grey आणि Interstellar Green आहेत. याचबरोबर,  Super Meteor 650 Tourer खरेदी करण्यासाठी कंपनीने दोन कलरचा ऑप्शन दिला आहे. यामध्ये पहिला कलर Celestial Red आणि दुसरा कलर Celestial Blue आहे. 

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डbikeबाईकAutomobileवाहन