Royal Enfield Bike: भारतात क्रूझर बाईक्सची एक वेगळीच क्रेझ आहे. जावा, येझदी आणि रॉयल एनफील्ड सारख्या कंपन्यांचे या सेगमेंटमध्ये वर्चस्व आहे. रॉयल एनफील्ड विक्रीच्या बाबतीत आघाडीवर आहेत. रॉयल इनफील्डच्या गाड्या महाग नक्कीच आहेत, पण आता GST 2.0 लागू झाल्यामुळे किमती कमी झाल्या आहेत. अशातच, कंपनीने आपल्या बाईक्सच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत.
रॉयल एनफील्डने गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की, भारत सरकारने जीएसटी दर कमी केल्यानंतर त्यांच्या सर्व 350 सीसी बाईक्सच्या किमती ₹22,000 पर्यंत कमी केल्या जातील. त्यानुसार, कंपनीने आता त्यांच्या सर्व बाईक्सच्या नवीन किमतींची जारी केली आहे. 350 सीसी श्रेणीतील हंटर 350 च्या बेस रेट्रो व्हेरिएंटची किमत 1.38 लाख रुपयांपासून सुरू होते. तर, या श्रेणीतील सर्वात महाग मॉडेल टॉप-स्पेक गोवा क्लासिकची किंमत ₹2.20 लाखापर्यंत जाते.
पूर्वी सर्व 2-व्हीलर वाहनांवर (मोटरसायकल आणि स्कूटर) 31% कर (28% GST + 3% सेस) लागायचा. मात्र, नवीन सुधारणा नुसार, 350cc पेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या सर्व 2-व्हीलर वाहनांना 18% GST स्लॅबमध्ये आणले आहे.
पाहा रॉयल एनफील्डची नवीन प्राइस लिस्ट
मॉडेल | कपात(रुपयांत) |
---|---|
Hunter 350 | 12,000 – 15,000 |
Bullet 350 | 15,000 – 18,000 |
Classic 350 | 16,000 – 19,000 |
Meteor 350 | 17,000 – 19,000 |
या बाईकच्या किंमती वाढल्या
350cc रेंज स्वस्त झाली, पण मोठ्या इंजिन क्षमतेच्या बाइक्सच्या किमती वाढल्या आहेत. या बाईक्सवर पूर्वी 31% (28% GST + 3% सेस) होता, पण आता 40% GST लागेल. त्यानुसार, रॉयल एनफील्ड Scram 440, Himalayan 450, Guerrilla 450, Interceptor 650, Continental GT 650, Shotgun 650, Bear 650, Super Meteor 650 यांचा समावेश आहे.
मॉडेल | वाढ (रुपयांत) |
---|---|
Scram 440 | 15,131 – 15,641 |
Guerrilla 450 | 17,387 – 18,479 |
Himalayan 450 | 20,733 – 21,682 |
Interceptor 650 | 22,52 – 24,604 |
Continental GT 650 | 23,712 – 25,645 |
Classic 650 | 24,633 – 25,607 |
Shotgun 650 | 26,874 – 27,889 |
Bear 650 | 25,545 – 26,841 |
Super Meteor 650 | 27,208 – 29,486 |