शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

रेनॉची क्विड ...क्रॉसओव्हरचा लूक असणारी छोटी हॅचबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 07:47 IST

 रेनॉ इंडियाच्या क्विड या छोटेखानी कारला भारतीय बाजारपेठेत येऊन दोन वर्ष झाली. रेनॉ व निस्सान यांनी विकसित केलेली ही कार. क्विडची १ लीटर व ऑटोगीयरमध्येही आवृत्ती काढण्यात आली आहे.

ठळक मुद्दे प्रथम ७९९ सीसी ताकदीची व नंतर १००० सीसी मध्ये जास्त ताकदीची क्विड भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात आली.कमी किंमतीत विशेष करून मध्यमवर्गीयांना आवडेल व शहरांमध्ये लोकांना चालवण्यास सुलभही असेल अशी रचना क्विडला दिली.

रेनॉ इंडियाच्या क्विड या छोटेखानी कारला भारतीय बाजारपेठेत येऊन दोन वर्ष झाली. रेनॉ व निस्सान यांनी विकसित केलेली ही कार. क्विडची १ लीटर व ऑटोगीयरमध्येही आवृत्ती काढण्यात आली आहे.

रेनॉ इंडियाने छोटी कार काढण्याचे मनात आणले काय व त्यांची कार भारतात चांगल्या रीतीने ग्राहकांपर्यंत पोहोचली काय, हे एक आश्चर्यच आहे. आतापर्यंत मोठ्या कार, एसयूव्हीशिवाय उत्पादन न करणाऱ्या रेनॉ कंपनीच्या एकंदर मोटारींकडे नजर टाकली तर हेच लक्षात येते. प्रथम ७९९ सीसी ताकदीची व नंतर १००० सीसी मध्ये जास्त ताकदीची क्विड भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात आली. ऑटो गीयरचेही व्हर्जन सादर करण्यात आले असून क्विडचे हे दुसरे वर्ष आहे.

मुळात फ्रेंच कंपनी असलेल्या रेनॉचे अंतर्गत रचना, आरेखन हे सुरेखच होते, क्विडमध्येही त्यांनी अंतर्गत रचना आकर्षक केल्याने व कमी किंमतीत विशेष करून मध्यमवर्गीयांना आवडेल व शहरांमध्ये लोकांना चालवण्यास सुलभही असेल अशी रचना क्विडला दिली. त्यामुळे भारतीय ग्राहकांना ती न आवडली असती तरच नवल. सौंदर्य, भारतीय ग्राहकांचा मोठ्या गाड्यांव्यतिरिक्त असलेला वर्गही ओळखला, नवी रंगसंगती, सुविधा व स्टायलीश लूक हे दिले. एकंदर चार श्रेणींमध्ये ही विविध कमी अधिक सुविधांसह आहे.

०.८ ली. व १ लीटर क्विडची तांत्रिक वैशिष्ट्येइंधन - पेट्रोलइंजिन- ७९९/ ९९९ सीसी (०.८ /१ ली.), ३ सिलिंडर, १२ व्हॉल्व, एमपीएफआय पेट्रोल, बीएस ४,/ १ लीटर इंजिन ६७ बीएचपीकमाल ताकद - ५३.३ बीएचपी @ ५६७८ आरपीएम/ ६७ बीएचपी@ ५५०० आरपीएमकमाल टॉर्क - ७२ एनएम @४३८६ आरपीएम / ९१ एनएम @४२५० आरपीएमगीयर्स - एकूण पाच. हाताने टाकण्याचे. ऑटो गीयरमध्येही वरच्या श्रेणीत उपलब्धलांबी, रुंदी व उंची (सर्व मिमि) - ३६७९/ १५७९/ १४७८व्हीलबेस - २४२२ मीटर्निंग रेडियस - ४.९ मीग्राऊंड क्लीअरन्स - १८० मिमि.बूट स्पेस - ३०० ली.ब्रेक - फ्रंट व रेअर - डिस्क व ड्रमइंधन टाकी क्षमता - २८ लीटरटायर व व्हील - १५५/८० आर १३ स्टील रिम व्हील आकार १३ इंच. ट्यूबलेस रॅडिअल टायर्सकर्ब वेट ६९९ किलो.(१ लीटर इंजिनामध्ये ऑटो गीयरमध्येही (AMT)उपलब्ध)

टॅग्स :Automobileवाहन