Nexon पासून Creta, XUV700 लाही देणार टक्कर, Renault बाजारात आणणार जबरदस्त SUV
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:14 AM2022-12-19T11:14:06+5:302022-12-19T11:18:45+5:30
आता रेनो एक अशी एसयूव्ही आणण्याची योजना आखत आहे. जी एकाच वेळी या सर्वांना टार्गेट करेल. या कारचे नाव रेनो अरकाना असे असू शकते.
भारतात सर्वाधिक लोकप्रीय असलेल्या एसयूव्ही संदर्भात बोलायचे झाल्यास, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा, ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोस सारख्या कारची नावं लगेच समोर येतात. यांच्या व्यतिरिक्तही इतरही काही एसयूव्ही आहेत. ज्यांना बाजारात जबरदस्त डिमांड आहे. यांत, महिंद्रा एक्सयूव्ही 700 आणि मारुति सुझुकी ग्रँड व्हिटाराचाही समावेश आहे. एक्सयूव्ही 700 चा वेटिंग पिरिअड एक वर्षांहूनही अधिक आहे. तसेच, ग्रँड व्हिटाराचा वेटिंग पिरिअड 6 महिन्यांपर्यंतचा आहे.
मात्र, आता रेनो एक अशी एसयूव्ही आणण्याची योजना आखत आहे. जी एकाच वेळी या सर्वांना टार्गेट करेल. या कारचे नाव रेनो अरकाना असे असू शकते. ही कार भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यानही दिसून आली आहे. ही कार पुढील वर्षात लॉन्च होईल असे मानले जात आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, या कारची लांबी - 4.5 मिटर, रुंदी- 1.8 मीटर आणि ऊंची 1.5 मीटर असू शकते. हिचे व्हीलबेस 2731 एमएम असण्याची शक्यता आहे. ही एक कूप स्टाइल एसयूव्ही असेल.
Renault Arkana आधीपासूनच जागतिक बाजारांत उपलब्ध आहे. युरोपात ही हायब्रिड सेटअपसह लॉन्च करण्यात आली आहे. माध्यमांतील वत्तांनुसार, कंपनी ही कार भारतामध्ये हायब्रिड सेटअपसहदेखील सादर करू शकते, यामुळे ही कार अधिक इंधन कार्यक्षम बनेल. या कारच्या माइल्ड हायब्रिड व्हेरिअंटची किंमत साधारणपणे 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. हिचे स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिअंट साधारणपणे 20 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
हिच्या भारत स्पेक मॉडलमध्ये ऑल एलईडी लाइट्स सेटअप, लेटेस्ट स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी असलेला टचस्क्रीन इन्फोटेनमेन्ट सिस्टिम आणि लेदर सिट्ससह जबरदस्त इंटिरिअर मिळेल. या कारमध्ये 1.3 लिटर पेट्रोल इंजिन अथवा 1.5 लिटर पेट्रोल इंजन ऑफर केले जाऊ शकते. याच बरोबर, या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक, दोन्ही गिअरबॉक्स दिले जाऊ शकतात.