शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

आता टमटम डिझेल नाही, विजेवर चालणार; पियाजिओकडून अ‍ॅपे एफक्स लाँच, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 16:24 IST

Piaggio Ape EV Launch: पियाजिओने रिक्षा क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केली आहे. थाड, थाड, थाड अशा आवाजावरून टमटम म्हणून ओळखली जाणारी रिक्षा आता सायलंट होणार आहे.

मुंबई: पियाजिओ व्हेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ही दुचाकी विभागातील युरोपियन प्रमुख कंपनी आहे. इटायलियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के उपकंपनी आणि भारताच्‍या आघाडीच्‍या या लघु व्‍यावसायिक वाहनांच्‍या उत्‍पादक कंपनीने आज कार्गो व पॅसेंजर विभागांमध्‍ये इलेक्ट्रिक वाहनांची एफएक्‍स श्रेणी (फिक्‍स्‍ड बॅटरी) सादर केली. ( Piaggio launches the Ape’ Electrik FX range of electric vehicles in the Cargo and Passenger segment )

नवीन आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्स ही ९.५ किलोवॅट पॉवर आऊटपुट असलेली विभागातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक कार्गो आहे. ही वेईकल उपयुक्‍त ६ फूट लांब कार्गो डेकसह प्रमाणित पूर्णत: मेटल बॉडी रचनेसह येते. तसेच ही वेईकल डिलिव्‍हरी व्‍हॅन, कचरा गोळा करणे इत्‍यादी सारख्‍या उपयोजनांसाठी सानुकूल देखील आहे.

पॅसेंजर वेईकल आपे ई-सिटी एफएक्‍स ही सर्वात लाभदायी तीनचाकी आहे. या वेईकलची उच्‍च दर्जात्मक वैशिष्‍ट्ये व आरामदायी राइड अधिक ट्रिप्‍स व उत्तम उत्‍पन्‍नाची खात्री देतात. दोन्‍ही उत्‍पादनांमध्‍ये अव्‍वल दर्जाच्‍या श्रेणीची वैशिष्‍ट्ये आहेत- जसे ब्‍ल्‍यू व्हिजन हेडलॅम्‍प्‍स, ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन, हिल होल्‍ड असिस्‍ट, रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग, ड्युअल टोन सीट्स, आकर्षक रंग व ग्राफिक्‍स, मल्‍टी-इन्‍फॉर्मेशन इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, बूस्‍ट मोड इत्यादी. एफएक्‍स फिक्‍स्‍ड बॅटरी श्रेणीमध्‍ये घरी व कार्यालयामध्‍ये सोईस्‍करपणे चार्जिंग करता येईल अशी वैशिष्‍ट्ये आहेत.

आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्‍स ही आज भारतामध्‍ये उपलब्‍ध असलेली सर्वात शक्तिशाली व वैविध्‍यपूर्ण कार्गो वेईकल आहे. ही व्हेईकल ई-कॉमर्स, गॅस सिलिंडर्स, मिनरल वॉटर बॉटल्‍स, एफएमसीजी, पालेभाज्‍या, कचरा गोळा करणे अशा अनेक विभागांच्‍या गरजांची पूर्तता करेल. कार्यसंचालन खर्च ५० पैशांपेक्षाही कमी असलेली ही शेवटच्‍या अंतरापर्यंत सामान परिवहनाची खात्री देणारी सर्वात किफायतशीर वेईकल आहे. आपे ई-सिटी पॅसेंजर कॅरियर अत्‍यंत कमी एनव्‍हीएच पातळ्यांसह प्रवाशांच्या शेवटच्‍या अंतरापर्यंत आरामदायी प्रवासाची खात्री देते. ही वेईकल तिच्‍या अत्‍यंत कमी कार्यसंचालन खर्चांसह सर्व प्रमुख शहरांमधील परिवहनामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल.

सबसिडी, किंमत व बुकिंग:आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स श्रेणी फेम २ सबसिडी आणि नोंदणी प्रक्रियेशी संबंधित इतर विविध लाभांसाठी पात्र आहे. फेम २ सबसिडीचा लाभ मिळाल्‍यानंतर आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्‍स सुरूवातीची एक्‍स–शोरूम किंमत रूपये 3,12,137 सह येते आणि आपे ई-सिटी एफएक्‍स सुरूवातीची एक्‍स-शोरूम किंमत रूपये 2,83,878 सह येते.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन