शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Ola Scooter Battery Price: ओला स्कूटरची बॅटरी, नको रे बाबा! त्यापेक्षा नवीन स्कूटर घेणे परवडेल, किंमत पाहून असेच म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:41 IST

ईलेक्ट्रीक स्कूटर परवडते म्हणून लोक घेत आहेत, परंतू या स्कूटरची बॅटरी हा सर्वात मोठा खर्च आहे. एकदा का बॅटरीची वॉरंटी संपली किंवा बॅटरी खराब झाली अन् ती वॉरंटीत नसेल तर तुमचा खिसा भसकन खाली झाला म्हणून समजा. 

देशात सध्या इलेक्ट्रीक दुचाकी विकणाऱ्यांमध्ये ओलाचा पहिला नंबर आहे. अनेक समस्या असल्या तरी ओलाची स्कूटर खप खप खपत आहे. असे असले तरी ओलानेही सर्वांना पर्याय देण्यासाठी पाच-सहा स्कूटर लाँच केल्या आहेत. म्हणजेच ८० हजारापासून दीड लाखापर्यंत सर्वांना ऑप्शन दिले आहेत. यात थोडीफार बॅटरी आणि पिकअप आदीमध्ये फेरफार केला आहे. 

ईलेक्ट्रीक स्कूटर परवडते म्हणून लोक घेत आहेत, परंतू या स्कूटरची बॅटरी हा सर्वात मोठा खर्च आहे. एकदा का बॅटरीची वॉरंटी संपली किंवा बॅटरी खराब झाली अन् ती वॉरंटीत नसेल तर तुमचा खिसा भसकन खाली झाला म्हणून समजा. 

बाजारात धुमाकूळ घालण्यासोबतच हा ब्रँड अनेकवेळा चर्चेत राहिला आहे, कधी आगीच्या घटनांमुळे तर कधी स्कूटरच्या गुणवत्तेबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. आता स्कूटरच्या बॅटरीची चर्चा होत आहे. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीच्या किंमतीबाबत दावा केला जात आहे.

ओलाच्या स्कूटरची बॅटरी स्कूटरच्या किंमतीपेक्षा निम्म्याने जास्त आहे. सामान्यत: इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटरीची किंमत वाहनाच्या किंमतीच्या ४० ते ५० टक्के असते. OLA S1 च्या बॅटरी पॅकची किंमत 66,549 रुपये, S1 प्रोच्या बॅटरीची किंमत 87,298 रुपये असल्याचे एका युजरने त्य़ाच्या पोस्टमध्ये सांगितले आहे. पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोत एक नग असे लिहिलेले आहे. यामुळे ही एका बॅटरीची किंमत दिसत आहे. असे असले तरी त्यात संपूर्ण पॅकेज असू शकते. याशिवाय पॅकेजमध्ये एमआरपीची किंमत देण्यात आली आहे. 

Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर किंमतीबद्दल बोलायचे झाले तर S1 Air ची किंमत 84,999 रुपये, S1 ची किंमत 99,999 रुपये आणि S1 Pro ची किंमत 1,27,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या बॅटरींची किंमत पाहता नवीनच स्कूटर घेणे त्या ग्राहकाला परवडणार आहे. ओला स्कूटरवर ५ वर्षांची वॉरंटी देत आहे. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर