शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Ola S1 Pro Scooter Problems List: एक दोन नाहीत, ओला एस१ प्रोमध्ये २५ प्रॉब्लेम्स; ग्राहक सांगून सांगून वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 10:10 IST

Ola S1 and S1 Pro scooters Problems list in Marathi: जगातील सर्वात मोठी मागणी नोंदविलेल्या या स्कूटरमध्ये एवढ्या समस्या आल्या की ग्राहक सोशल मीडियावर तक्रारी करू लागले आहेत.

गेल्या वर्षभरात ओलाच्या स्कूटरने जेवढी प्रसिद्धी कमावली तेवढीच गमावलीसुद्धा आहे. ओलाच्या स्कूटरला तुफान प्रतिसाद मिळाला होता, परंतू ग्राहकांना डिलिव्हरी काही होता होत नव्हती. आज देतो, उद्या देतो असे म्हणत अखेर कंपनीने डिसेंबर, जानेवारीला मोजक्या ग्राहकांना स्कूटर देण्यास सुरुवात केली आणि याच मोजक्या ग्राहकांनी ओलाच्या या हायफाय स्कूटरची पिसे काढली. 

OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय

जगातील सर्वात मोठी मागणी नोंदविलेल्या या स्कूटरमध्ये एवढ्या समस्या आल्या की ग्राहक सोशल मीडियावर तक्रारी करू लागले. कोणाची स्कूटर आल्या आल्याच बंद पडली, कोणाची सुस्साट मागे धावू लागली, कंपनीने सांगितलेली रेंज कोणालाही मिळाली नाही. कोणाची जळाली, कोणाची तुटली. अगदी कालपर्यंत या स्कूटरचे प्रॉब्लेम काही कंपनीला सॉल्व्ह करता आलेले नाहीत. सुरुवातीला १.०८ लाख रुपयांना मिळणारी ही स्कूटर आता १.४ लाखांवर जाऊन पोहोचली. ही देखील एक समस्याच बरं का. कारण ओलाच्या अॅपवरून बुकिंग करताना कंपनीने काही बँका फायनान्ससाठी दिल्यात. त्यांच्याकडून कर्ज घेतानाही लोकांना समस्या येऊ लागल्या आहेत. कोणाला फायनान्सचा ऑप्शनच दिसत नाहीय. म्हणजे बँकांची यादी रिकामी दिसतेय. 

ओलाचे मोठमोठे अधिकारी एकामागोमाग एक असे रांगेत कंपनी सोडत आहेत. यामध्ये एक क्वालिटीचे बडे अधिकारी पण आहेत. ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये एक दोन नाही तर ग्राहकांनीच नोंदविलेले २४ ते २५ प्रॉब्लेम आहेत. काहींना ही स्कूटर घेतल्यापासून तीनदा ही स्कूटर कंपनीकडे टो करून पाठवावी लागली आहे. चला ओला एस १ प्रो स्कूटरमध्ये काय काय समस्या आहेत ते पाहू... (OLA Electric Scooter Problems)

  1. अचानक बॅटरी संपण्याची समस्या
  2. हँडल सैल होण्याची समस्या
  3. अचानक स्पीड ड्रॉप समस्या
  4. 50% चार्ज झाल्यानंतरही शटडाउन
  5. डिस्प्ले चालू होत नाही
  6. बॅटरी संपल्यावर अंडरसीट स्टोरेज लॉक होते
  7. अॅक्सलरेटर ग्लिच: अचानक रिव्हर्स मोडमध्ये जाणे
  8. बॅटरी संपल्यावर हँडल लॉक होते
  9. खराब क्लालिटीचा साइड स्टँडOla Scooter Fire: ओला स्कूटरला भविष्यातही आग लागू शकते; कंपनी मालकानेच केला खुलासा 
  10. डिस्प्ले आपोआप बंद होणे
  11. टर्न-इंडिकेटर स्विचेस, होम बटण योग्यरित्या काम करत नाही
  12. इलेक्ट्रिक स्टार्ट स्विच काम करत नाही
  13. OS अचानक काम करणे थांबवते
  14. विक्रीनंतरची खराब सेवा
  15. रोडसाइड असिस्टंट (RSA) साठी दीर्घ प्रतीक्षा करा
  16. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्क्रीन स्वतःच चालू आणि बंद होते
  17. इको मोड स्वतःच सुरु होतो.
  18. मागील डिस्क ब्रेकमध्ये आवाजाची समस्या
  19. चार्जिंग पोर्ट लिड जाम होणे
  20. स्कूटर पॅनेलमधील मोठे गॅप
  21. थोडा दाब पडला तरी ब्रेक लीव्हर डॅमेज होणे
  22. 30% बॅटरी असल्यास छोटी चढणही चढत नाही. 
  23. चार्ज केल्याचे डिस्प्लेने दाखवले तरीही स्कूटर बंद पडते
  24. डिस्प्ले 5-10 मिनिटांसाठी काम करणे थांबवतो, अडकतो आणि काहीही वापरता येत नाही
  25. आरटीओ नोंदणी आणि विमा दाव्याच्या समस्या
टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर