शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 13:14 IST

Ola S1 electric scooter launched : ओला S1 ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने भारतात नवीन S1 ईव्ही लाँच केली आहे. या ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. नवीन ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखीच आहे. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यादरम्यान 499 रुपयांमध्ये ईव्ही बुक केली जाऊ शकते. नवीन ओला S1 ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल. बाजारात  Ather 450X, Simple One (विक्री अद्याप सुरू झालेली नाही), TVS iQube आणि Okinawa Okhi 90 सारख्या ईव्ही ओला S1 ची स्पर्धा असणार आहे.

नवीन ओला S1 मध्ये 2.98kWh बॅटरी पॅक असणार आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.  कंपनीचा दावा आहे की, नवीन ओला S1 फुल सिंगल चार्जवर 141 किमीची रेंज देऊ शकते. नवीन S1 मध्ये म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपेनियन अॅप आणि रिव्हर्स मोड यासारखी अनेक फीचर्स मिळतील. तसेच, S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखी दिसते, ज्याचे डिझाइन एलिमेंट बरेचसे समान आहेत. ही स्कटूर चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केली जाईल. यामध्ये जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट असे कलर असतील.

ओला S1 लाँच करण्यासोबतच कंपनीने S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी नवीन 'खाकी' कलर स्कीम सुद्धा जाहीर केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर 'खाकी' कलर स्कीम असणाऱ्या ओला S1 Pro च्या 1947 युनिट्सची निर्मिती केली जाईल. ओला S1 Pro 'खाकी' एडिशनची किंमत 1.49 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

ओलाची इलेक्ट्रिक कारयासोबतच, ओला इलेक्ट्रिक आपली पहिली इलेक्ट्रिक कारही बाजारात आणणार आहे. ही कार 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, ही भारतात बनवलेली सर्वात स्पोर्टी दिसणारी कार असेल. ओलाची इलेक्ट्रिक कार 4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते आणि 500 ​​किमी पेक्षा जास्त रेंज देईल. नवीन ओला इलेक्ट्रिक कारमध्ये असिस्टेड ड्राइव्ह टेक्नॉलॉजी, कीलेस ऑपरेशन आणि ओलाचे मूव्ह ओएस हे फीचर्स असतील, असा दावा अग्रवाल यांनी केला आहे.

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर