शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Ola ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इलेक्ट्रिक बाईकची सुद्धा एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 14:24 IST

कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला ओस १ एक्स (Ola S1X) लाँच केली. ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

नवी दिल्ली :  १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने ग्राहक दिन २०२३ साजरा केला. या दरम्यान, कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला ओस १ एक्स (Ola S1X) लाँच केली. ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याचबरोबर, कंपनीने एक बाईक सुद्धा आणली आहे. त्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या होत्या. दरम्यान, कंपनीने एक नव्हे तर चार इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले. याशिवाय, कंपनीने सेकेंड जनरेशन प्लॅटफॉर्मवर तयार केलेला Ola S1 Pro देखील लाँच केली आहे. 

ओलाचा दावा आहे की, ही भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक आहे, जिचा वेग १२० किमी प्रतितास आहे. तर Ola S1 Pro च्या दोन नवीन कलर व्हेरिएंटने देखील एन्ट्री केली आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी ओला कंपनीने इलेक्ट्रिक बाईकच्या रूपात सर्वात मोठी भेट दिली आहे. कंपनीने आज एकाच वेळी चार नवीन इलेक्ट्रिक बाईक्स सादर केल्या आहेत. यामध्ये ओला क्रूझर, ओला अॅडव्हेंचर, ओला रोडस्टर आणि ओला डायमंड हेड बाईक्सचा समावेश आहे. 

लॉन्च इव्हेंटमध्ये कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, कंपनी सेकंड जनरेशन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. ओला स्वतःहून इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी सेल बनवणार आहे. मात्र, पुढील वर्षीपासून सेलचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरशिवाय कंपनीने नवीन ऑपरेटिंग सिस्टम MoveOS 4 देखील सादर केली आहे.

नवीन मॉडेलची किंमतOla S1 Pro च्या नवीन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १,४७,९९९ रुपये आहे. तर, Ola S1 X ची एक्स-शोरूम किंमत ८९,९९९ रुपयांपासून सुरू होते. ओला कंपनीने Ola S1 X ला तीन व्हेरिएंट Ola S1 X, Ola S1 X (2kWh) आणि Ola S1 X+ मध्ये लाँच केले आहे. व्हेरिएंटनुसार पुढीलप्रमाणे किंमत (एक्स-शोरूम ) पाहू शकता.

Ola S1 X+ : १,०९,९९९ रुपयेOla S1 X : ९९,९९९ रुपयेOla S1 X (2kWh): ८९,९९९ रुपये

कंपनीने आणली खास ऑफर!  ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे रिझर्व्हेशन आजपासून सुरू झाले आहे. तसेच, डिलिव्हरी सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. काही व्हेरिएंट डिसेंबरपासून मिळण्यास सुरुवात होईल. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने खास ऑफर आणली आहे. या आठवड्यात तुम्ही ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यास, तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. या आठवड्यात इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन