शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ओला देशातील 400 शहरांमध्ये 4 हजारांहून अधिक चार्जिंग स्टेशन उभारणार, ग्राहकांना ई-स्कूटर मोफत चार्ज करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 13:13 IST

Ola Electric : ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर केवळ 18 मिनिटांत ई-स्कूटरची बॅटरी 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यास सक्षम असेल.

नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक देशभरात 'हायपरचार्जर' (Hyperchargers) नावाने चार्जिंग नेटवर्क उभारणार आहे. या 'हायपरचार्जर'च्या मदतीने ओला ई-स्कूटर 18 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकते. ग्राहकांना 6 महिन्यांसाठी याचा मोफत लाभ घेता येणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, कंपनी आगामी काळात चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार करणार आहे. ओलाने यावर्षी आपली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 आणि ओला एस 1 प्रो लाँच केली. कंपनीने अलीकडेच देशातील काही शहरांमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू केली आहे.

तसेच, ओला इलेक्ट्रिकचे भारतात 4,000 हून अधिक चार्जिंग पॉइंट्स इंस्टॉल करण्याचे उद्दिष्ट आहे. हायपरचार्जर पहिल्यांदा बीपीसीएल पेट्रोल पंपासारख्या सार्वजनिक ठिकाणी बसवले जात आहेत. त्यासोबतच निवासी संकुलात बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले.

जूनपर्यंत मोफत चार्जिंगसर्व शहरांमध्ये हायपरचार्जर रोल आउट सुरू झाले आहे. दीड महिन्यात देशभरात 4000 हून अधिक हायपरचार्जर बसवले जातील. ओलाचे सर्व ग्राहक जूनपर्यंत मोफत याचा लाभ घेऊ शकतील, असे भाविश अग्रवाल म्हणाले. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये ओला इलेक्ट्रिकने पहिले हायपरचार्जर लाँच करण्याची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते की, 'हायपरचार्जर' सेटअप अंतर्गत आपल्या ग्राहकांसाठी चार्जिंग सपोर्ट इंस्टॉल केले जाईल, जे देशातील 400 शहरांमधील 100,000 हून अधिक ठिकाणी/टचपॉइंट्सवर असेल.

8 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल स्कूटर ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर केवळ 18 मिनिटांत ई-स्कूटरची बॅटरी 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यास सक्षम असेल. यासह, स्कूटर एका चार्जवर 75 किमीचा अर्धा पल्ला कव्हर करू शकेल. मात्र, ओला प्रत्येक स्कूटरसोबत होम-चार्जर देखील देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांची स्कूटर घरबसल्याही चार्ज करता येईल. कंपनीने आपल्या वेबसाइटवर शहरनिहाय चार्जिंग नेटवर्क नमूद केले आहे आणि अनेक ठिकाणी लोकेशनही सांगितले आहे. बहुतेक चार्जिंग स्टेशन टियर 1- आणि टियर 2 मध्ये आहेत. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन