शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

Ola EV subsidy: ओला स्कूटर बुक केली असेल तर...; 66,000 रुपयांपर्यंत नुसती सबसिडीच मिळणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 17:18 IST

Ola Electric scooter subsidy: या स्कूटरची अद्याप किंमत किती असेल हे बाहेर आलेले नसले तरी देखील या स्कूटरवर मिळणारी बससिडी पाहून तुमचे डोळे गांगरणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने इलेक्ट्रीक स्कूटर, कारवर सबसिडी जाहीर केल्या आहेत.

ओला इलेक्ट्रीक स्कूटर लवकरच भारतात लाँच होणार आहे. या स्कूटरची बुकिंग 15 जुलैपासून सुरु झाली असून 499 रुपये बुकिंग असल्याने लोकांच्या उड्या पडल्या आहेत. यामुळे पहिल्याच दिवशी ओलाला 1 लाखाहून अधिक बुकिंग मिळाली आहे. जगातील सर्वाधिक बुकिंग मिळालेली स्कूटर बनली आहे. (Ola scooter subsidy by central government and Maharashtra government, calculation)

Yamaha Fascino 125 FI Hybrid: देशातील पहिली हायब्रिड स्कूटर लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...

या स्कूटरची अद्याप किंमत किती असेल हे बाहेर आलेले नसले तरी देखील या स्कूटरवर मिळणारी बससिडी पाहून तुमचे डोळे गांगरणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने इलेक्ट्रीक स्कूटर, कारवर सबसिडी जाहीर केल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रीक स्कुटरच्या किंमती या 42-57% पर्यंत कमी होणार आहेत. (how much ola scooter cost after subsidy in Maharashtra.)

Ola electric scooter चे तुफान बुकिंग; जगात बनविला रेकॉर्ड, जाणून घ्या 24 तासांत काय घडले...

गणित समजून घ्या...हीरो ऑप्टिमा ईव्हीची किंमत 1.22 लाख रुपये असेल तर केंद्र सरकार 39 हजार आणि दिल्ली राज्य सरकार 15000 रुपए सबसिडी देते. महाराष्ट्र सरकारने देखील गेल्या आठवड्यात ईव्ही पॉलिसी जाहीर केली आहे. यानुसार ईव्ही वाहनांवर 2.75 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. यानुसार रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स फ्री करण्यात आला आहे. यामुळे या एकंदरीत सबसिडीचा विचार करता 54000 रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. म्हणजेच हीरो ऑप्टिमा 64 हजार रुपयांना पडेल. 

केंद्र सरकारची सबसिडी डीलरला मिळते तर राज्य सरकारची सबसिडी ही ग्राहकांच्या खात्यात जाणार आहे. महाराष्ट्रात स्कूटरवर ही सबसिडी 25000 रुपयांपर्यंत मिळते. अशावेळी जर ओला बुक केली असेल  आणि जर ओला ईलेक्ट्रीक स्कूटरची किंमत 1.30 लाख रुपये असेल तर केंद्राची 39 हजार आणि राज्याची 25000 रुपये असे मिळून जवळपास 64000 रुपये वाचणार आहेत. म्हणजेच ओला ईलेक्ट्रीक स्कूटर 66000 रुपयांना मिळेल. (Ola electric scooter will get 66000 subsidy in Maharashtra.)

टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन