शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Okinawa Electric Scooter Showroom Fire Video: ओकिनावाची इलेक्ट्रीक स्कूटर घेताय? अख्खा शोरूम जळाला, सांगाडाच उरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 16:06 IST

Okinawa Electric Scooter Showroom Fire Video: ओकिनावाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागण्याची ही चौथी घटना आहे. इलेक्ट्रीक स्कूटरच्या आगीच्या आजवरच्याअन्य घटनांत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे.

Okinawa autotech dealership Fire: इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागल्याच्या घटनांमध्ये गेल्या महिन्यात मोठी वाढ झाली आहे. उष्णता एवढी वाढली आहे की, भल्या भल्या कंपन्यांच्या स्कूटरमधून धूर निघू लागला आहे. नाशिकमध्ये कंटेनरमधील स्कूटर जळाल्याची घटना ताजी असताना आता अख्खा शोरुमच जळून खाक झाल्याचे समोर आले आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे ही आग ओकिनावा या इंडियन कंपनीच्या शोरुमला लागली आहे. या कंपनीवर चीनची मॉडेल भारतात आणण्याचाही आरोप होत आला आहे. या कंपनीने नुकतीच लाँच केलेली हाय रेंजची स्कूटर देखील हुबेहुब एका चीनच्या कंपनीच्या स्कूटरची कॉपी आहे. परंतू ही कंपनी मात्र एका भारतीयाची आहे. ओकिनावाने गेल्याच आठवड्यात आगीच्या घटनांमुळे काही हजार स्कूटर माघारी बोलविल्या होत्या. 

तामिळनाडूच्या ओकिनावा डीलरशीपमध्ये ही आग लागली आहे. न्यूज एजन्सी आयएएनएस नुसार, इलेक्ट्रीक स्कूटर निर्माता कंपनी ओकिनावा ऑटोटेक (Okinawa Autotech) च्या तामिळनाडूतील शोरुममध्ये अचानक आग लागली. या आगीत पूर्ण शोरुम जळून खाक झाला आहे. कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक लोकांच्या मदतीने आग विझविण्यात आली आहे. एका स्कूटरला पहिल्यांदा आगा लागली होती. परंतू ही आग एकामागोमाग एक अशा स्कूटरना लागली आणि अख्खा शोरूम जळाला. 

ओकिनावाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागण्याची ही चौथी घटना आहे. इलेक्ट्रीक स्कूटरच्या आगीच्या आजवरच्याअन्य घटनांत दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. मार्चच्या अखेरीस घराच्या बंदीस्त पार्किंगमध्ये इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्याने घरात झोपलेल्या वडील आणि मुलीचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ओलाची हायफाय स्कूटरदेखील पुण्यात भर रस्त्यावर पेटली आहे. अन्य घटना जरी रस्त्यावर किंवा अन्य उघड्यावर झालेल्या असल्या तरी इलेक्ट्रीक स्कूटर या धोकादायक ठरू लागल्या आहेत. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरfireआग