शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

Electric Scooters मध्ये आग: 'या' कंपनीनं घेतला मोठा निर्णय; परत मागवल्या हजारो गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 22:33 IST

कंपनीनं आपल्या गाड्यांच्या हेल्थ चेकअप कॅम्पेनअंतर्गत हा निर्णय घेतला असून बॅटरीत कोणत्याही प्रकारचा दोष आढळला तर ते त्वरित ठीक करण्यात येणार असल्याचंही सांगितलं.

देशात इलेक्ट्रीक स्कूटरला (Electric Scooter) आग लागण्याच्या घटनांदरम्यान लोकप्रिय इलेक्ट्रीक दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या ओकिनावा ऑटोटेकने (Okinawa Autotech) मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रेझ प्रो (Praise Pro) स्कूटरचे ३२१५ युनिट्स परत मागवले आहेत. स्कूटरच्या बॅटरीमध्ये काही दोष असल्यास कंपनी ताबडतोब दुरुस्त करेल, असे ओकिनावाने म्हटले आहे. हा ओकिनावाच्या हेल्थ चेकअप शिबिरांचा एक भाग आहे.

"बॅटरीत कोणत्याही प्रकारचं सैल कनेक्शन किंवा कोणत्याही नुकसानीटी तपासणी केली जाईल आणि ओकिनावा अधिकृत डीलरशीपमध्ये ही मोफत दुरुस्त केली जाईल," असं कंपनीनं एका निवेदनाद्वारे म्हटलंय. दुरूस्तीदरम्यान कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रीक टू व्हीलर उत्पादक ओकिनावा डीलर भागीदारांसोबत काम करत आहे. यासाठी, कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क साधत आहे. कंपनीचे देशभरात सुमारे ५०० डीलर्सचे नेटवर्क आहे.

आगीच्या घटनागेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रीक दुचाकींमध्ये आगीच्या घटना समोर येत आहेत. अलीकडे जितेंद्र इलेक्ट्रीकच्या सुमारे ४० इलेक्ट्रीक वाहनांना (EVs) आग लागली. कारखान्यातून कंटेनरमध्ये ई-स्कूटर नेत असताना हा अपघात घडला होता. यापूर्वीही ओला आणि प्योअर ईव्हीच्या स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. २८ मार्च रोजी पुण्यात Ola S1 इलेक्ट्रीक स्कूटरला आग लागली होती. व्हिडीओमध्ये, मिडनाईट ब्लू कलर Ola S1 Pro ला आग लागल्याचं दिसत होतं. त्याचवेळी चेन्नईमध्ये प्योअर ईव्ही स्कूटरला आग लागल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरOlaओला